पान:आरोग्यशास्त्र.pdf/२६१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

जंतुविचाराचीं भूलत २५३ बॅक्टेरियाचे आडवे तुकडे पडून त्यांचे संख्येची वाढ होते.. बॅक्टेरिया मध्यभागी चिंचोळी होऊन त्यांचे अलग भाग होतात. अशा रीतीनें त्यांची नवी उत्पत्ति व वाढ होते. कांहीं जातींच्या बॅक्टेरियांची वाढ त्यांचेमध्यें अंडीं उत्पन्न होऊन होते. बॅक्टेरियांची दोन शकलें होऊन अंडी बाहेर पडतात. अंड्यांवर कृमिघ्न द्रव्यांची क्रिया वडत नाहीं. बॅक्टेरियांचे जीवन बॅक्टेरिया है सजीव कण असल्यामुळे त्यांचे प्राणरक्षण व प्रजोत्पत्ति होण्यास त्यांना पोषक द्रव्ये मिळालीच पाहिजेत. बॅक्टेरियांचे अंगांत इतर उद्भिज पदार्थांप्रमाणें हिरवें द्रव्य नसल्यामुळे त्याचे घटनेत अस- णारा कार्बन, हैड्रोजन व नैट्रोजन बिकट रचनेच्या प्रोटिन्स व कार्बो- हैड्रेट अशा सेंद्रिय पदार्थांपासून घ्यावा लागतो. कांहीं बॅक्टेरियांना अमोनिया कार्बोनस, आमोनिया, अशा सारख्या साध्या पदार्थांपासून पुरेसा नैट्रोजन घेतां येतो. एका बॅक्टेरियांना तर तो हवेपासून घेता येतो. बॅक्टेरियाची स्वाभाविक वाढ होण्यास सल्फेट, फास्फेट्स व सोडियम क्लोराईड ( मीठ ) अशा निरिंद्रिय नमकांची जरुरी असते. हे सर्व पदार्थ पाण्यामध्ये मिश्र असावे लागतात. कारण पाण्याचे अभावी बॅक्टेरिया निष्क्रीय होतात. परंतु त्यांचे पैकीं पुष्कळ जातींचे व विशेषतः त्यांची अंडीं कोरड्या परिस्थितीत फार कालपर्यंत जिवंत राहतात. पण जल सर्वस्वीं नाहींसें केल्यास यांपैकीं पुष्कळ प्रकारचे जंतु जलद मरून जातात. दश (दहा) अंश सेंटिग्रेडपेक्षां ज्यास्त शीतमानांत ठेवल्यास त्यांची वाढ बंद होते, पण ते मरत नाहींत. ६५ अंश सेंटिग्रेड उष्णतेनें अंडी नसलेले बॅक्टेरिया मरण पावतात. अंड्यांवर उष्णतेचा परिणाम फार कमी घडतो. परंतु अनेक वेळीं शिजविल्यानें त्यावर परिणाम होतो. म्हणून एकदा पदार्थ जंतुविरहित करावयाचा असल्यास तो ओळीने