पान:आरोग्यशास्त्र.pdf/२६३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

जंतुविचाराचीं मूलतत्त्वें २५५ उकिरडे, मो-या, पायखाने, नासके व सडके पदार्थ या ठिकाणीं हे जंतु असंख्य असतात. कुजणें व सडणें या क्रिया जंतूंपासून होतात. जंतुजन्य द्रव्ये सेंद्रिय (ऑर्ग्यानिक उद्भिज व प्राणिज ) पदार्थांवर सूक्ष्म जंतूंची रासायनिक क्रिया घडून त्यांचें पृथःकरण होऊन, त्यांपासून अमोनिया, कॅर्बालिक अॅसिड वायू, सल्फ्यूरेटेड हैड्रोजन, मार्शग्यास, हैड्रोजन असले स्वल्प घटनेचे पदार्थ उत्पन्न होतात. या क्रियेस कुजणें किंवा सडणें म्हण- तात. या क्रियेत दुर्गंधी वायु उत्पन्न होतात व घन पदार्थ उत्पन्न होतात. बॅक्टेरिय स्वापासून टॉक्सिन नामक आल्ब्यूमिन विशिष्ट द्राव्य विषे उत्पन्न होतात व तीं बहेर पडतात. डिप्योरिया व टिटॅनस या रोगांत मुळ विकार मर्यादित जागेत असतो, म्हणून त्यामध्यें उत्पन्न होणारे विष शरिरांत मिनण्याला अवकाश न देतां जितकें लौकर इंजेक्शन द्यावें तितकें गुणाचें प्रमाण अधिक असतें. रोगसंचारक ( इन्फेक्शन ) बेसुमार वाढ होणाऱ्या जंतूंचें आक्रमण प्राण्यावर होऊन त्यास इजा होणें यास रोगसंचार म्हणतात. सूक्ष्म जंतूंचें आक्रमण व वाढ झाल्याने होणाऱ्या रोगास स्पर्शसंचारी रोग म्हणतात. ( सामान्य संज्ञा आहे ). असल्या रोगामधील विषारी द्रव्यांचा प्रवेश दुसऱ्याचे शरिरांत झाल्यास तो रोग बहुधा दुसन्यास जडतो. जंतूंनी व्यापलेल्या एका व्यक्तीपासून निघणारीं उत्सर्जित द्रव्यें, साव, त्वचेचे कण इत्यादि द्वारां ते जंतु बाहेर पडून ते ते रोग उत्पन्न करतात. त्या रोगना त्या त्या जंतूंचें प्रसरण शीततेचे मानानें वातसंचारी ( इन्फेक्स ) किंवा स्पर्श- संचारी (काँटेजिअस ) म्हणतात. देवीचें विष नुसत्या वाऱ्याने देखील फार दूरवर पसरतें म्हणून देवीला वातसंचारी रोग म्हणतात.