पान:आरोग्यशास्त्र.pdf/२६४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२५६ आरोग्यशास्त्र खरजेचा प्रसार होण्यास स्पर्श अथवा न्यूनाधिक निकट संबंध व्हावा लागतो.. अशा आजारास स्पर्शसंचारी रोग म्हणतात. स्पर्शसंचारी हा शब्द वातसंचारी रोगांना देखील लावतात. हिंवज्वर हा रोग वात- संचारीहि नाहीं व स्पर्शसंचारीहि नाहीं. डासांचे द्वारां त्याचे विषाचा शरिरांत अंतःक्षेप झाल्याशिवाय हा रोग पसरत नाहीं. रोगजनक कृमींपासून व्याधी उत्पन्न होण्याची कारणें चार आहेत. ( १ ) शरिरांतील निरनिराळ्या भागांत पोहोंचणारा प्राणवायु ( ऑक्सिजन ) स्वत:चें जीवनासाठी कृमी खर्च करतात. ( २ ) ते शरिरांत प्रोटीन्स व अन्य पदार्थ भक्षण करतात. ( ३ ) त्यांचे पुंज रक्ताच्या व इतर पदार्थांच्या वाहिन्यांची तोंडें बंद करितात. ( ४ ) जंतूंपासून चालक धर्माचीं विर्षे उत्पन्न होतात. संचारी रोगांचा प्रसार खालील मार्गोनी होतो. ( १ ) अन्नमार्ग, उदाहरणार्थ विषूचिका (कॉलरा), टायफाइड फीवर ( आंत्र संनिपात) इत्यादि. ह्या रोगांत अन्न अथवा पाणी दूषित झालेलें असतें. (२) श्वासमार्ग, जसें न्यूमोनिया, इन्फ्ल्यूएंझा, क्षयग्रंथी विकार व कधी कधी प्लेग. ( ३ ) जखमेचे द्वारां शरिरांत अंतःक्षेप, जसें धनुर्वात, ग्लॅडर्स, ऍन्थँक्स, श्वानदंश. ( ४ ) श्लेष्मल त्वचा ( म्यूकस मेंब्रेन), जसें उपदंशाचे विष. घटसर्पात ( डिप्थेरियति ) त्याचे विशिष्ट जंतु नाकाचे किंवा घशाचे श्लेष्मल त्वचेंत रोकून ठेवलेले असतात. ( ५ ) कीटक. रोगजनक जंतूंचा प्रवेश आपल्या शरिरांत वरचेवर होत असतो. तरी पण आपल्या अंगांत थोडीबहुत रोगप्रतिबंधक शक्ति असल्यामुळे