पान:आरोग्यशास्त्र.pdf/२६५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

जंतुविचाराची मूलतत्त्वें २५७ त्यांचा परिणाम बहुतेक वेळा घडत नाहीं. सशक्त मनुष्यांत ही शक्ति ज्यास्त असते, म्हणून ते रोगास सहसा बळी पडत नाहींत. अशक्त लोकांत रोगप्रतिबंधक शक्ति कमी असते. आपल्या रक्तांत असणाऱ्या पांढऱ्या पेशी रक्तांत शिरणाऱ्या जंतूंचा नाश करतात, परंतु जर नव्या प्रकारचे जंतू रक्तांत शिरले तर त्यांच्याशी लढण्याची संवय त्या पेशींना नसल्यामुळे नव्या जंतूंचा नाश त्यांना करतां येत नाहीं; व रोग होतांच जर नव्या जंतूचा परिचय त्या पेशींना करून दिला तर त्या जंतूंशी लढून त्यांचा व त्यांजपासून झालेल्या विषाचा नाश त्या करतात व रोग होऊ देत नाहींत. या कल्पनेवरून हॅपकीन नामक शोध कानें प्लेगचें इनॉक्युलेशन म्हणजे प्लेग टोचणें शोधून काढून मानव जातीवर मोठे उपकार करून ठेवले आहेत. टोचण्याचे द्रव्यांत प्लेगाचे मृत जंतू असतात. स्पर्शसंचारी रोगांचे प्रसारास कांहीं कीटक कारणीभूत होतात, म्हणून त्यांसंबंधी थोडी माहिती पुढें दिली आहे. कीटक कीटकांमुळे रोगांचा प्रसार पुष्कळ होतो. मलेरिया, ग्रंथिक सन्निपात हे सर्व रोग कीटकांच्या द्वारां जडतात. जेथें जेथें त्यांना खाद्य मिळतें तेथें तेथे ते राहतात. जसें, जमीन, पाणी व उष्णरक्त प्राणी व मनुष्य. डांस, माशा, ढेकूण, पिसवा, मुंग्या इत्यादि कीटक आपणां- मार्गे घरीदारों चोहोंकडे लागलेले असतात. कीटकांमुळे एका जागेपासून दुसऱ्या जागी आजार कशा रीतीनें पसरतो ह्याचा काळजीपूर्वक विचार केला पाहिजे. कधीं कधीं त्यांच्या शरिराला जंतू चिकटून अथवा त्यांचे मलाचे द्वारां रोगसंचार होतो. १७