पान:आरोग्यशास्त्र.pdf/२६६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२५८ आरोग्यशास्त्र परंतु रक्तशोषक प्राण्याची गोष्ट निराळी आहे. शरिरांत रोगाच्या जंतूंचा प्रत्यक्ष अंतःक्षेप झाल्या शिवाय सांसर्गिक रोग्यांचा प्रसार होणार नाहीं व रक्तशोषक कीटकांशिवाय अन्य मार्गांनीं हा प्रसार घडावा हें कमी संभवनीय आहे. डिटेरा व हिनोकोट असे रक्तशोषक कीटकांचे दोन वर्ग आहेत. डांस, वाळवंटांतील माशा व घरांतील माशा ह्या डिटेरा वर्गात मोडतात. ढेंकूण व उवा दुसऱ्या वर्गात येतात. खरजेचे जंतु व टिक हे कीटक वर्गात येत नाहींत. तरी पण त्यांचे मुळें कांहीं आजार पसरतात. टिक्स- मुळे उलटणाऱ्या ज्वराचा ( रिलॅप्लिंग फीवर) फैलाव होतो. मुंग्यांमुळेंहि कांहीं रोग पसरतात. माशाः – माशांचं शरीर व पाय केसाळ असतात. त्यांना दुधाची फार आवड असते. त्या दुधावर व उष्ट्या ताटांवर व अन्नावर बसतात, त्यांना दांत नसतात म्हणून घन पदार्थ खावयाचा असल्यास त्यावर त्या ओकतात व त्यांत घन पदार्थाचा भाग विरघळला म्हणजे शोषून घेतात. माशा फार अधाशी असतात; इकडे त्या अन्नाचे भक्षण करतात व इकडे इगत असतात. माशा इकडे मळावर बसतात व इकड़े अन्नावर बसतात. म्हणून टायफाईड ज्वर व विषूचिका ह्यांचा फैलाव - माशांमुळे होतो. मांशाच्या पोटांत जे जंतू असतात त्यांचाहि फैलाव अन्नाचे द्वारा होतो. पिसवाः-पिसवांग्या चोचींच्या बाह्य भागीं एक आच्छादन असतें त्याच्या आंतील बाजूस एक नळी असते. तिच्या खालचे भाग करवती- सारखी दोन पात्र असतात. ह्या शस्त्राने पिस्सू मनुष्याच्या अंतड्याला भोक पाडते व नळीच्या द्वारा रक्त शोषून घेते. प्युलेक्स चेपॉय नांवांचा उंदराच्या अंगावरील प्युलेक्स चेपॉय नांवाच्या पिसवांमुळे एका