पान:आरोग्यशास्त्र.pdf/२६७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

जंतुविचाराची मूलतत्त्वे २५९ उंदरापासून दुसऱ्या उंदरांमध्ये प्लेगजंतूंचा फैलाव होतो, इतकेंच नव्हे तर दूषित प्राण्यापासून मनुष्यांमध्ये त्यांचा फैलाव होतो. ढेकूणः - ढेकणांचा संहार हैड्रोसिऍनिक ऍसिड व फॉर्माल्डेड . ह्यांच्या धुरीनें व अधिक कढत केलेल्या वाफेनें होतो. पूर्ण स्वछता, रिजार्सिन, टपटेन व अक्कलकाऱ्याची पूड ह्यांनीं ज़मीन, भिंती व पलंग घासणें ह्या उपायांनी ढेकूण नाहींसे होतात. जंतूंच्या प्रसारास किंवा रोगांच्या संसर्गास आळा घालणें:- भिन्न मार्गानी रोगाचा संसर्ग होतो हे ध्यानांत ठेऊन घरांतील व गांवांतील 'हवा शक्य तितकी शुद्ध ठेवावी. पाणी अथवा दूध, ह्याच्या शुद्धतेबद्दल पूर्ण काळजी घ्यावी. रस्ते व घरें पुरतीं निर्मळ ठेवावीं. परंतु सांथीचा आरंभ होत आहे दिसल्याबरोबर सांथीचा प्रसार थांबविण्यास खालील उपाय केले पाहिजेत:-(१) खबर देणें ( नोटिफिकेशन ); (२) पृथक् ठेवणें ( आयसोलेशन ); ( ३ ) कॉरंटेन; ( ४ ) प्रतिबंधक इनॉक्युलेशन; ( ५ ) जंतुनाश. (१) खबर देणे :-- सांसर्गिक रोग दृष्टीस पडल्यास प्रत्येक डॉक्टरानें त्या बाबतींत आरोग्याच्या अधिकाऱ्यास अथवा जिल्ह्यांतील सर्व लोकांस खबर दिली पाहिजे. असें केल्यानें त्या अधिकाऱ्यास अवश्य उपाय वेळेवर करावयास सांपडतात. (२) पृथक् ठेवणैः -- सांसर्गिक रोग झाला तर घरांतल्या घरांत रोग्यास एकीकडे ठेवावें. त्यास स्वतंत्र हॉस्पिटलमध्यें धाडणें अधिक चांगलें.. रोग्याच्या खोलींत अडगळ नसावी. तेथें नडीपेक्षां ज्यास्त सामान किंवा कपडे नसावेत. दरवाजे व खिडक्या उघड्या ठेवाव्या. रोग्याची सेवा करणाऱ्या इसमाशिवाय त्याच्यापाशी कोणाला जाऊं देऊ नये. आगाऊ जंतुविर- हित केल्याशिवाय रोग्याच्या खोलींतून कपडा अगर पात्र बाहेर जाऊं देऊं नये. मलमूत्र व टाकून दिलेले अन्न, जंतुघ्न द्रव्ये असलेल्या पात्रांत