पान:आरोग्यशास्त्र.pdf/२७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पाणी १९ वायूचे साहाय्यानें, (२) ओझोनचे द्वारा, ( ३ ) गर्द नारिंगी रंगाचे किरणांनी. कि कोई sop Dip ना ( १ ) क्लोरिन वायूची रीत - बॅसिलस कोलै इत्यादि सूक्ष्म जंतु व इतर प्राणिज पदार्थ नाहींसे करण्यास्तव कॅलशिअमचें, सोडिअमचें अथवा मॅग्नेशिअमचें है पोक्लोरेटचें द्रावण वापरतात. दहा लक्ष भाग पाण्यांत १ ते २ भाग क्लोरिन वायु पुरा होतो. वरील पदार्थांचा उपयोग होण्याचें कारण असें कीं त्यांचेपासून निर्माण होणारा क्लोरिन वायु हा सूक्ष्म जीव- कोटींचा व इतर प्राणिज पदार्थांचा नाशक आहे. पाण्यांतील जंतूंचा नाश करण्यास पाण्यांत अर्धातासपर्यंत क्लोरिन वायु राहू द्यावा. पाण्यांत निसर्गतः असणाऱ्या कॅर्बानिक वायूमुळे वरील द्रव्यांतून क्लोरिन वायु बाहर पडतो. MP PIS IFIMPS प्रजा पाण्याची शुद्धि करून टैफॉइड ज्वराच्या सांथी बंद करण्याचे कामी वरील क्षारांचा उपयोग लिंकन शहरांत १९०५ साली सफल झाला. ह्या कृतीनें शुद्ध केलेल्या जलाला क्लोरिनची घाण येते. ती नाहींशी करण्या- साठी उद्भिज कोळसे घातलेल्या शोधकाचे द्वारां हैं पाणी पुरतेपणीं निर्बंध होतें. क्लोरिन वायूने जंतुनाशनाचे काम वालुकाशोधकापेक्षां अल्प खर्चात होते. व जल सर्वथा शुद्ध होतें. वालुकाशोधक वापरले तर जंतुनाशनासाठी पाणी कित्येक दिवस सांठवून ठेवून नंतर शोधकांत सोडलें जातें. क्लोरिन वापरण्याला जलनिधि करण्याची यातायात व खर्च करण्याचें कारण नाही. मलानें अशुद्ध झालेल्या नदीजलाचे शुध्यर्थ हा उपाय श्रेयस्कर आहे. नदीजल गढूळ असल्यास वाळूचे उथळ शोधकां- तून तें गाळून घ्यावें. अमेरिका खंडांत जलशोधनार्थ ह्या वायूचा प्रायः उपयोग करतात. For Res काफी र (२) ओझोन नामक चुनीकृत प्राणवायूचा उपयोग जलशोधनार्थ करतात. ओझोन तयार करण्यासाठीं विद्युदुत्पादक संस्था काढाव्या लागतील