पान:आरोग्यशास्त्र.pdf/२७०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२६२ आरोग्यशास्त्र (३) गृहसंबंधीं कॉरंटैनः- दूषित गृहांतील लोकांचेवर कारंटैन कधीं कधीं सुरू करावें लागतें. देवचा रोग असल्यास शेवटच्या रोग्याचा स्पर्शसंचाराचा काल लोटल्यावर निदान दहा दिवस संपेपर्यंत किंवा त्या घरांतील लोकांनीं देवी काढून घेईपर्यंत त्या घरांतील लोकांवर कडक नजर ठेवावी. गवळी, शिंपी इत्यादि वर्गांचे लोकांवर देखील कारंटेन सुरू करावें. सर्व लोकांना व विशेषतः मुलांना दूषित घरांत जाऊ देऊ नये. कधीं कधीं सौम्य प्रकारचीं कारंटैन अमलांत आणतात. दूषित जागेपासून येणाऱ्या लोकांची दहा दिवस रोजची तपासणी ठेवतात. आपल्या तब्बेतीची तपासणी करून घेण्यासाठी अधिकान्यासमोर हजर राहण्याची त्यांचेवर सतिं असते. निर्भयता (इम्युनिटी ) स्वाभाविक स्थितींत अथवा औषधांनी किंवा अन्य उपायांनीं उत्पन्न केलेल्या परिस्थितींत एखाद्या रोगापासून किंवा एकाद्या प्रकारच्या जंतूपासून बचाव होणें बास निर्भयता म्हणतात. उदाहरणेंः- देवी काढण्यामुळे जेनरनें मसूरिका रोगापासून निर्भयता प्राप्त करून दिली. पॅस्टॉरनें श्वानदंशांत, कॉचनें टबर्कलमध्यें, बेहेरिंग, रो व किटॅस्टो ह्यांनी घटसपांत व धनुर्वातांत, हॅफाकेननें प्लेग व विष- चिर्केत ( कालयांत ), रॉसनें मलेरियांत व रैटनें टैफॉइड ज्वरांत निर्भयता उत्पन्न करण्याचे यशस्वी शोध लावले आहेत. वर्णनाच्या सोयीसाठी निर्भयतेचे खाली लिहिल्याप्रमाणें वर्गीकरण केलें आहे.