पान:आरोग्यशास्त्र.pdf/२७२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२६४ माराग्यशास्त्र डॉक्टर लोक लावतात. आणि ह्या कामी उपयोगांत येणाऱ्या सौम्य केलेल्या जंतुजन्य पदार्थांना अथवा मंद केलेल्या विषांना Vaccines व्हॅक्सिन्स म्हणतात. Passive immunity वरील प्रकाराच्या जर एकाद्या जनावराच्या अंगीं एकाद्या जंतूसंबंधीं पुष्कळ निर्भयता उत्पन्न केली तर त्या जना - वराच्या सिरमच्या पिचकारीचा त्याच जंतूंपासून एकाद्या प्राण्यास रोग झाल्याबरोबर किंवा रोग झाल्यानंतर अल्प कालानें उपयोग केल्यास चांगला गुण येतो. झालेल्या आजारावर रोगनाशक उपाय म्हणून सिरम वापरतां येते. परंतु ही निर्भयता अल्पकालिक असते. कारण, त्यामुळे रक्तांत " ऍटिबॉडीज ” उत्पन्न होत नाहींत. " पॅसिव इम्युनिटी करण्यासाठी वापरलेल्या सिरमचे परिणाम दोन तऱ्हेचे होतात. ज्या जनावराचें सिरम काढतात त्याच्या अंगांत पूर्वी जर जंतूंनीं प्रवेश केला असेल तर त्याच्या पासून काढलेल्या सिरमवर ." बॅक्टेरिऑलिटिक " अशी चिठ्ठी लावतात. ह्या सिरममुळे ( टॉक्सिन जंतुजन्य ) विषावर कांहीं एक परिणाम घडत नाहीं, म्हणून त्याला ऍटिमायक्रॉलिक म्हणतात. उलटपक्षीं ज्याचें सिरम काढतात त्या जनावराच्या अंगांत प्रारंभीं जर गाळून घेतलेल्या टॉक्सिन विषाचा अंतःक्षेप केला असेल तर त्याच्यापासून मागाहून काढून घेतलेल्या सिरमच्या अंगीं टॉक्सिन विष निवर्य करण्याचा प्रभाव असतो. अशा सिरमला ऍटिटॉक्सिक म्हणतात. जंतुनाशन सांसर्गिक रोगांचे विशिष्ट प्रकारचें विष किंवा जंतू ह्यांचा नाश करणे ह्यास जंतुनाशन म्हणतात. रोग्याच्या शरिरांत स्पर्शसंचारी विकारांतील विषाराची वाढ असंख्य पीनें होत असते. आजारपणांत