पान:आरोग्यशास्त्र.pdf/२७३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

जंतुविचाराची मूलतत्वे २६५ तो विषार, श्लेष्मल त्वचा व त्यांतील स्राव आणि उच्चा व चर्म ह्यांच्या द्वारां शरिराच्या बाहेर पडत असतो. त्यामुळे रोग्याच्या भोवतालची हवा व त्याच्या खोलींतील बिछाना, कपडे व सामान ह्यांवर जंतू पसरतात. ह्या सर्व ठिकाणच्या जंतूंचा नाश करणें हा निर्जंतुकरणाचा हेतु आहे. जी द्रव्ये सांसर्गिक रोग उत्पन्न करणाऱ्या कृमींचा नाश करतात त्यांना कृमिघ्न ( डिसइन्फेक्टंट्स ) म्हणतात. ज्या द्रव्यांमुळे रोगजनक जंतूंची वाढ खुंटते व ह्या कारणानें कुजण्याच्या क्रियेस प्रतिबंध होतो त्या द्रव्यांना कोथप्रतिबंधक ( ऍटिसेप्टिक्स ) म्हणतात. ज्या पदार्थ- मुळे कुजण्याच्या क्रियेंत उप्तन्न झालेल्या द्रव्यांचा प्राणवायूशी संयोग होतो व त्यामुळे दुर्गंधीचा नाश होतो अथवा दुर्गंध वायु शोषले जातात, त्यांना दुर्गंधनाशक ( डिओडरायजर्स ) म्हणतात. घनापेक्षां द्रव जंतुनाशक द्रव्य चांगलें असतें. कारण, तें सर्वभर पूर्णपणें मिसळता येते. शिवाय घन जंतुनाशकांचे द्रावण केल्याखेरीज तीं जंतू- वर क्रिया करण्यास समर्थ नसतात. रोगजनक जंतू शरिराच्या बाहेर पडण्याच्या पूर्वी किंवा पडल्यावर त्यांचा नाश करावा व करतां येईल असे वाटणें साहजिक आहे. परंतु जंतूंचा नाश करण्याइतकीं द्रव्यें शरिरांत गेल्यानें किंवा हवेत सोडल्यानें अपाय होतो. टैफॉइड ज्वरासारख्या विकारांत फक्त विष्टेंत जंतु असल्यामुळे रासायनिक द्रव्यांनीं त्यांचा तात्काळ नाश करतां येतो. परंतु अन्य विकारांत रोगमुक्ति झाल्याशिवाय किंवा रोग्यापासून जंतूंची उत्पत्ति होणें बंद झाल्यावांचून रोग्याच्या खोलीचा व आंतील सामानाचा पूर्ण जंतुनाश करतां येणार नाहीं. प्रत्यक्ष व्यवहारांत खालील कारणांसाठीं जंतुनाशन करावें लागतें. ( १ ) आजान्याच्या खोलीच्या भिंती, कोपरे, जमीन व खोली- तील सामान इत्यादींवर असलेल्या जंतूंचा नाश करणे.