पान:आरोग्यशास्त्र.pdf/२७४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२६६ आरोग्यशास्त्र ( २ ) मल व रोग्याच्या शरिरांतून निघणाऱ्या खावाचा सांसर्गिक धर्म नाहींसा करणें. ( ३ ) मनुष्याच्या सहाय्याने होणाऱ्या रोगाचा प्रसार दूर करणें. (४) रोगोत्पादक जंतु रोग्याच्या शरिराचे बाहेर असतील तेथें त्यांचा नाश करणें- अमुक एक द्रव्य जंतुघ्न आहे एवढी माहिती असून उपयोग होत नाहीं, तर तें द्रव्य किती घेतलें पाहिजे व त्याचे द्रावण कोणत्या प्रमाणांत करावें हें ठाऊक पाहिजे. जंतुघ्न द्रव्य जंतूंच्या निकट येऊन पोहोचल्याशिवाय त्यांचा उपयोग होत नाहीं. कोणत्याहि जंतुघ्न पदार्थाचें कार्य क्षणमात्रांत होणार नाहीं. कारण तेथील विद्यमान जंतूंवर एकाच काळों त्यांचे पुरेसें प्रमाण पोहोंचत नाहीं. म्हणून जंतुघ्न पदार्थांची क्रिया कांहीं काळपर्यंत टिकणारी असावी. कॅर्बालिक अॅसिडासारख्या द्रव्याची क्रिया अधिक टिकते. परंतु ती प्रत्यक्ष जंतूंवर विषारी परिणाम करतात. म्हणून सेंद्रिय (ऑर्ग्यानिक) पदार्थांचा स्पर्श झाल्याबरोबर जीं द्रव्यें आपणामधील प्राणवायूचें विसर्जन करून आपल्या स्वरूपाला मुकतात तीं द्रव्यें गौण समजावीं. तीस मिनिटांचे अति ज्यांचे कार्य पूर्ण होत नाहीं तीं द्रव्यें समाधानकारक नव्हेत. जीं द्रयें उच्च दर्जाच्या सेंद्रिय पदार्थांवर हानिकारक व विषारी कार्य करीत नसून स्वस्त असतात व पाण्यांत सहज विरघळणारी व वापर - ण्यास सोईची असतात तीं अधिक चांगली. ज्या पात्रांत तीं वापरतात किंवा ज्या पदार्थावर त्यांचा उपयोग करतात त्यांच्यावर अनिष्ट परिणाम घडणार नाहीं अशीं तीं असावीं व त्यांना दुर्गंध येऊं नये. i ज्या द्रव्यावर क्रिया करावयाची असते, त्या पदार्थाच्या स्थितीवर जंतुनाशकाचा परिणाम अवलंबून असतो. स्पर्शसंचारी जंतू स्वाभा- विक स्थितींत असलेल्या थोड्या फार सेंद्रिय ( ऑग्यानिक ) पदार्थात "