पान:आरोग्यशास्त्र.pdf/२७५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

जंतुविकाराची मूलतत्वें २६७ नेहमी मिश्र असतात व अशा स्थितीमधील जंतूंचा नाश करण्यासाठी जंतुनाशक द्रव्य कोणत्या प्रमाणांत घेतलें पाहिजे हा व्यवहारांतील प्रश्न आहे. प्रयोगशाळेत जंतुनाशकाचा अनुभव कढीमध्ये घातलेल्या जंतूंवर वेतलेला असतो. परंतु व्यवहारांत मलमूत्र इत्यादिमधील जंतूंवर क्रिया करावयाची असते. सोयीसाठीं जंतुघ्न द्रव्यांचे तीन वर्ग करतात. ( १ ) नैसर्गिक, (२) फिजिकल, (३) रासायनिक. स्वाभाविक जंतुघ्न द्रव्यैः - ताजी हवा, सूर्यप्रकाश, सूर्यकिरण हीं नैसर्गिक जंतुनाशक द्रव्यें आहेत व तो बहुतेक जंतूंचा नाश करितात. ताजी हवा जोरदार परंतु मंदगामी जंतुनाशक आहे. तिच्यामध्ये असणाऱ्या प्राणवायूमध्यें हें सामर्थ्य मुख्यतः आहे. परंतु मुद्दाम उत्पन्न केलेल्या ताज्या प्राणवायुमध्यें ही शक्ती फार अधिक असते. ताज्या हवें- तील ही शक्ती सूर्यकिरणांनी वाढते. जंतुयुक्त पदार्थांतील आर्द्रता नष्ट झाल्यानें सर्व प्रकारच्या जंतूंमधील रोगनाशक शक्ती थोड्या फार वेळानें कमी होते. टायफॉइड ज्वर, क्षयग्रंथी व घटसर्प ह्यांतील जंतु पुष्कळ कालपर्यंत शुष्क होत नाहींत. त्यांचे चैतन्य फार मुदतीनंतर कमी होतें. प्रत्यक्ष सूर्यकिरणांत टायफॉइडचे जंतु अर्धा ते दोन तासांच्या आंत मृत्यु: पावतात व सूर्यप्रकाशांत त्यांचा नाश होण्यास पांच तास लागतात. क्षयग्रंथीतील द्रव्याच्या थराच्या जाडीपणाच्या मानानें त्यांतील जंतूंचा नाश होण्यास थोड्या मिनिटांपासून कित्येक तास लागतात, असे कॉच म्हणतात. जंतुयुक्त पदार्थ सुकण्यानें जंतूंची वाढ बंद होते, आणि बिछाना, कपडे व दुसरे पदार्थ सूर्यकिरणांत व हवेंत ठेवल्याने पुरेसा कोरडेपणा येतो आणि त्या पदार्थात असलेल्या जंतूंवर हवेतील प्राण- वायूचा घातक परिणाम होतो. जंतुनाशनांच्या कामी सूर्यप्रकाशाची पुष्कळ मदत होते. जरी घटसर्प, ग्रंथिक सन्निपात इत्यादि पुष्कळ