पान:आरोग्यशास्त्र.pdf/२७६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२६८ आरोग्यशास्त्र जातींचे जंतू सूर्यकिरणांमुळे नाश पावतात, तथापि जंतुनाशनाच्या कामी नुसत्या सूर्यकिरणांवर विसंबून चालत नाहीं. हवेंत व अर्द्रतेंत ठेव- लेल्या हृट्टी जंतूंचा देखील सूर्यकिरणांमुळे न्यूनाधिक कालांत नाश होतो. परंतु ऍथँक्स विकारांतील अंड्यांचा नाश उन्हाने होत नाहीं. सूर्यकिरणांमुळे जंतुयुक्त द्रव्याचा प्राणवायूशी संयोग होऊन किंवा कदाचित् अल्प प्रमाणांत ओझोन व हैड्रोजन परऑक्सैड ह्या दोन शक्तिमान पदार्थांची उत्पत्ति होऊन त्यांचा परिणाम बहुधा घडत असावा. ह्या कामी नारिंगी किरण फिक्या तांबड्या किराणांपेक्षां आर्धक जोरदार असतात. 1 फिजिकल जंतुघ्न फिजिकल जंतुघ्न द्रव्यांत सुकी उष्णता व आर्द्र उष्णता ह्यांचा अंतर्भाव होतो. सुक्या उष्णतेत विस्तवाने ज्वलन व उष्ण हवा ह्यांच्या उपयोगांचा समावेश होतो. ज्वलनः--अल्प किंवा विनकिमतीच्या पदार्थांवर व पुष्कळ वेळा रोग्याच्या खोलींत अत्यंत परिणामकारक उपाय योजतात. मुख व नासिकेतील सावानें व स्पर्शसंचारी विकार झालेल्या रोग्याच्या जखमेतील पुवाने भरलेल्या चिंध्या सुकण्यापूर्वी न टाकाव्या. जुन्या चटया, उशा व असले पुढें न लागणारे पदार्थ ह्यांवर तेल ओतून जंतुघ्न गृहांत वर पेटवून द्यावें. विषूचिका व आंत्र सन्निपात ज्वरांतील मळ जाळून टाकावा. तशी सोय नसल्यास त्यांत लांकडाच्या भुशासारखे पदार्थ पुष्कळ मिसळून त्यावर तेल ओतून पेटवावें. कढत उष्ण हवाः—— कापडाचें निर्जंतुकरण करण्याची ही कृती झपाट्यानें लुप्त होत आहे. कारण प्रतिरोधक जंतूंचा नाश करण्यास लागणाऱ्या उच्च उष्णमानानें कापडाला अपाय होतो व जाड कापडांत कढत हवेचा प्रवेश होण्यास फार विलंब लागल्याने काळाची हानी