पान:आरोग्यशास्त्र.pdf/२७७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

जंतुविकाराची मूलतत्त्वें २६९ होते. काथ्याच्या चटयांसारख्या वस्तूंच्या पृष्ठभागाला १००० सेंटिग्रेट उष्णमानाची हवा तीन तास लागली तरी प्रतिरोधक जंतु राहाणें संभवनीय असतें. परंतु लोकर, रेशीम व चामड्याच्या पदार्थाना १२०० सें. चेवर उष्णतामान पोहोंचल्यास खास नुकसान पोहोंचतें व ते जिस करपतात. निदान त्यांची चकाकी व लवचिकपणा नाहींसा होतो. रक्त, मळ इत्यादि अल्ब्युमिन जातीचे डाग पडलेले असले तर ते पक्के होतात. परंतु निर्जंतुकरणापूर्वी कपडे भिजवून डाग गार पाण्यानें धुऊन काढावे. उष्णतेनें सरस, मेण इत्यादि पदार्थ विरघळतात व पदार्थ अति शुष्क झाल्याने ढिसूळ होतात. मोरोक्को व इंडिया रबर ह्यांना उष्ण हवा उपयोगी आहे. केश- युक्त चर्म, पुस्तकें इत्यादि पदार्थ शिजविल्याने किंवा वाफेनें बिघडतात. त्यांनाहि उष्ण हवा उपयुक्त आहे. आई उष्णतेंत शिजविणें व वाफ ह्यांचा अंतर्भाव होतो. शिजविणे:--जतुयुक्त द्रव्य वीस मिनिटेंपर्यंत उकळल्यावर तें बहुतेक सर्वदा मुक्रजंतु होतें. परंतु बॅसिलस ऍथँक्ससारख्या अधिक प्रतिरोधक जंतूंवर त्याहून अधिक काल उकळल्याचा देखील परिणाम घडत नाहीं. बिछाना व कपडे शुद्ध करण्याचे कामी ह्या उपायाचा अधिक वेळ उपयोग होतो. परंतु उकळल्यानें रक्ताचे व मळाचे डाग पक्के होतात म्हणून ते प्रथम गरम पाण्यानें किंवा साबणाने धुऊन काढून नंतर उकळावे. Iza 1 सारख्या पदार्थांचे घन द्रावणांत शिजवून किंवा बंद भांड्यांत वाफेचे द्वारा मळाचें निर्जंतुकरण करतात. उकळ- ल्यानें लोकरीचे कपडे सुरकतात. वाफः --- चटया, गाद्या, उशा इत्यादि जाड व उष्णतावाहक धर्म कमी असलेल्या पदार्थात उष्ण हवेपेक्षां दाबामध्ये असलेली वाफ