पान:आरोग्यशास्त्र.pdf/२७८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२७० आरोग्यशास्त्र आकारमान - कार वेगाने शिरते. गार पदार्थात उष्ण वाफ दिल्यानें पाणी होऊन तिचें इतकें सूक्ष्म होतें. हा निर्वात प्रदेश व्यापण्यासाठी अधिक वाफ पुढें घुसते. असे होत होत पदार्थांतील सर्व भागांत व रंध्रांत वाफेचें पाणी व वाफ घुसते. १०० सें. उष्णमान १० मिनिटें लागल्यास शरिरावर होणाऱ्या उवा व त्यांची अंडीं नाश पावतात व उकळत्या पाण्यांत ५ मिनिटांत नष्ट होतात. वाफेनें जंतुनाश करण्यासाठीं जे स्टोव्ह हल्लीं प्रचारांत आहेत त्यांचे खालीं लिहिल्याप्रमाणें वर्ग आहेत. ( १ ) ज्या स्टोव्हमध्ये दाब असलेली वाफ नसते असे. हे स्वस्त असतात. परंतु ह्यांतील वाफेचें उष्णमान १०० म्हणून हे सर्वांत कमी परिणामकारक अथवा (२) एका स्क्वेअर इंचावर २, ३ सें.चेवर चढत नाहीं, अल्पक्रियवान् असतात. अथवा ४ रत्तल अशा • कमी दाबाची वाफ ज्यांत वापरली जाते असे स्टोव ह्यांत ११०° सें. पर्यंत उष्णमान चढतें व तें बहुतेक कार्याला पुरेसें होतें. तरी ज्यास्त उष्णमान उत्पन्न करणाऱ्या स्टोव्हपेक्षां हे कमी उपयोगी असतात. ( ३ ) ज्या स्टोव्हमध्ये १० रत्तल किंवा अधिक दाबाची वाफ चापरावयास सांपडते असे. ह्यांमध्ये ११५° ते १२०° से. ह्यांपेक्षां अधिक उष्णमान करूं नये व अशा उष्णमानांत पदार्थ ? ते ३ तास ठेवल्यानें ते जंतुविरहित होतात. वाफेवर जितका दाब ज्यास्त तितकी तो अधिक लवकर पदार्थात घुसते व निर्जंतुकरणास वेळ कमी लागतो. वाफ नेहमी हवाविरहित पाहिजे. ती प्रवाहयुक्त किंवा कोंडलेली असते. प्रवाहयुक्त वाफेनें कपड्यांचे रंभ्रांतील हवा बाहेर काढण्याचें -कार्य घडतें व ह्यामुळे ती आंत शिरल्यास मदत होते. परंतु ह्या रीतीनें चाफ अधिक लागते म्हणून इंधन ज्यास्त खर्च होतें. ज्या स्टोव्हमध्ये