पान:आरोग्यशास्त्र.pdf/२८०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२७२ आरोग्यशास्त्र इमारतीत किंवा खेड्यांतून दुसऱ्या खेड्यांत नेतां येतात. त्यांचे आकार- मानाप्रमाणे त्यांना ६० ते १५० गिनी किंमत पडते. कमी दाबाची किंवा अतिउष्ण (सुपरहीटेड ) वाफ वापरल्यास उष्णमान १०४° ते ११०° सें. पेक्षां जास्त वाढत नाहीं. म्हणून अशा- मध्ये निदान एक तासपर्यंत पदार्थ ठेवावे लागतात. जंतुनाशनाचे गृहांत दोन खोल्या असाव्या. त्याचे दरम्यान जाड भिंत असावी. व त्या भिंतीत डिसइन्फेक्टर ठेवावे. दोन खोल्या पूर्ण- पर्णे विभक्त असाव्या. त्यांचे दरम्यान जाळ्या वगैरे कांहीं नसाव्या. एका खोलींतून दूषित पदार्थ यंत्रांत घालावे दुसऱ्या खोलींत शुद्ध झालेले बाहेर पडावे. दूषित पदार्थ नेणाऱ्या गाड्या निराळ्या असाव्या व त्या भिन्न जागी ठेवाव्या. पदार्थ हाताळणाऱ्या मजुरांनीं कपड्यांवरून लांब कफनी घालावी. रासायनिक जंतुनाशक द्रव्यें हीं तीन प्रकारची असतात : - ( १ ) घन, (२) प्रवाही, (३) वायुरूप. खालील प्रकारचीं द्रव्ये किंवा द्रावणें जंतुनाशनार्थ वापरतात. रसकापूर:- परक्लोरैड आफ मर्क्युरी, करोजिव सब्लिमेट ( Hg Cl. ) ह्यामध्ये जंतुनाशक धर्म सर्वांत मोठा आहे. व हा वापरण्यास फार सोईचा आहे. ह्याचें द्रावण रंगहीन व गंधहीन असतें. परंतु त्याचा मनुष्यावर विषारी परिणाम घडतो. त्याचें द्रावण आम्ल धर्माचें नसेल तर अल्ब्युमिन द्रव्यावर त्याचा भार सारखा बसतो, म्हणून सेंद्रिय पदार्थांचे कणांचे अभ्यंतरभागीं शिरण्याची शक्ति मर्यादित होते. प्रत्यक्ष जंतूंवर हें जलाल विष आहे. शिवाय जंतूंमधील घटक प्रोटोप्लॅजम गोठवून जंतुनाशनाला अधिक उप- योगी पडते. ह्याचे १००० भाग असलेले द्रावण शेकडा ५ भाग