पान:आरोग्यशास्त्र.pdf/२८१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

जंतुविचाराची मूलतत्त्वें २७३ असलेल्या कॅर्बालिकच्या द्रावणापेक्षां अधिक चांगलें असतें. व स्पोअर नसलेल्या बॅक्टेरिआचें निःसंशय नाशक आहे. परंतु स्पोअर असलेल्य बॅक्टेरिआसाठी ५०० त १ प्रमागाचे द्रावण वापरलें पाहिजे. ह्याच्या द्रावणाने धातूची पात्रे झिजतात व यामुळे त्याचे पृथ:करण होण्याचा संभव असतो. म्हणून अशा पात्रांत तीं ठेवू नयेत. ह्रीं द्रावणें आम्ल धर्माची करावीत. व ह्यांना पाणी समजून पिण्यांत येऊं नयेत म्हणून त्यांत थोडा रंग घालावा व काळ्यानिळ्या बाटल्यांत ठेवून त्यांवर विषारी चिठ्ठी लावावी. अर्धा औंस रस कापूर + एक औंस हैड्रोक्लोरिक ऍसिड + ३ ग्रेन ऍनिलिन निळा रंग व १५ शेर पाणी ह्यांचें मिश्रण सोईचें असतें. ह्यांत रसकापराचें प्रमाण १००० मध्ये १ असतें. मर्क्यूरिक आयोडाईड (Hg 12 ) हें कोरेडपेक्षां फार कमी विषारी आहे व आल्ब्युमिनचे अभ्यंतरीं तितका प्रवेश करीत नाहीं. जंतुनाशक गुणामुळे हें त्याच्या बरोबरीचें किंवा कांकणभर ज्यास्त आहे. दात धुण्यास त्याचे द्रावण उत्तम असतें. नुसत्या पाण्यांत तें विद्यत होत नाहीं. परंतु त्यांत पुष्कळ पोटॅश आयोडेड घातल्यानें तें विरघळते. 'वातूंवर ह्याचा अनिष्ट परिणाम घडतो. फेनाल जातींचीं द्रव्यें काळी, तेलकट व प्रवाही असतात. तीं डांबरापासून होतात. ह्रीं विषारी, झोंबणारी व आल्ब्युमिनला गोठ- विणारी असतात. कॅलिक ऍसिड ( Ce HO) हें क्रेमकि ( C, H, O ) ऍसिडापेक्षां किंचित् गौण आहे. तरी फेनाल वर्गांतील इतर द्रव्यांपेक्षां ह्याचा उपयोग फार अधिक करतात. हें खरें दुर्गंधिनाशक नाहीं. परंतु ह्याच्या उप्र व तीव्र वासानें हानिकारक वायूंची व वाफांची घाण उमजण्यांत येत नाहीं. प्रतिरोधक बॅक्टेरिआसाठी निदान शेंकडा १८