पान:आरोग्यशास्त्र.pdf/२८२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२७४ आरोग्यशास्त्र पचिचें द्रावण वापरलें पाहिजे. दगडी कोळशाला विध्वंसक उष्णता लावून ऊर्ध्वपातनानें निघणारे अनेक पदार्थ बाजारांत मिळतात व ते बहुतेक कॅबोलिक अॅसिडाइत के जंतुघ्न आहेत. ते काळ्या रंगाचे व प्रवाही आहेत. पाण्यांत घातल्यावर त्यांचें दुग्धरूप द्रावण होतें. तें विषारी नाहीं व शुद्ध कॅर्बालिक अॅसिडापेक्षां कांहीं स्वस्त असते. सुती कपडे शेंकडा ५ भाग कॅर्बालिकच्या द्रावणांत भिजवून तीन चार दिवस उन्हांत टाकावेत. Izal ऐझल जोरदार व उपयुक्त जंतुघ्न आहे. तो विषारी नाही. तो पाण्यांत चांगला मिसळतो व त्याचा वास हृद्य आहे. शेंकडा ३ ह्या प्रमाणांतील त्याच्या द्रावणानें पांच मिनिटांत स्पोअर नसलेले बॅक्टेरिआ नष्ट होतात व शेकडा १० प्रमाणाच्या द्रावणानें बॅसिलस ऍटॅक्सचे अत्यंत विषारी स्पोअर १५ मिनिटांत नाश पावतात. कांबळी व लोक- रौचे दुसरे पदार्थ व नारळाच्या चटया वगैरे पदार्थ ऐझलमध्ये दोन घंटे बुडविल्याने जंतूंचा नाश होतो. Cyllin सिलिन ऐझलइतकें जंतुनाशक आहे. Formalin चामढ्याचे पदार्थ शेकडा एक भाग फॉर्मालिनच्या द्रावणाने पुसावे. Saprol सॅनॉल हा काळ्या उदी रंगाचा तेलकट द्रव आहे. हा कॅर्बालिक ऍसिडाइतका जोरदार असून पाण्यांत विरघळतो, व ह्या. द्रावणावर तेलकट तवंग येतो. दगडी कोळशाच्या डांबरापासून निघणाऱ्या Izal, Lysol Cyllin, Sanitas okcl, Sanitas-betox-kerol, Ince Dongalls M. O. & Elind, Lawe's fluid, Cioke's confectant fluid. Zeye's fluid etc. etc. सारख्या पदार्थामध्ये निरनिराळ्या प्रमाणांत फेनॉल, न्यूट्रल तेर्डे, राळ, स्नेही आम्ल द्रव्ये व पाणी हीं असतात.