पान:आरोग्यशास्त्र.pdf/२८३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

जंतुविचाराची मूलतत्त्वें २७५ त्यांपैकी बहुतेकांत राळ व स्नेही आम्ल द्रव्ये असतात, म्हणून तीं पाण्यांत विरघळतात. परंतु बाकीच्यांमध्यें जिलेटिनसारखा राळविरहि दुग्धकारी Emulsifier पदार्थ वापरतात. हीं द्रव्ये पाण्यांत मिसळल्या नंतर ह्याचें दूधरूप मिश्रण फार सूक्ष्म होतें. ह्या इमल्शनमधील सूक्ष्म कणां- मध्यें एक प्रकारची गति असते व ह्या गतीमुळें Micro-organism ना एक प्रकारचें Bombardment बम्बार्डमेंट होतें. ह्या गतीमुळे त्यांतील कृमिघ्न कार्यास मदत होत असावी. Chloride of Lime ( CaCl 2 O 2, CaCl 2 ) Bleaching Powder होंत क्लोरैड व हैपोक्लोरेट ऑफ कॅलशियम ह्यांचें मिश्रण असतें. ह्यामध्ये शेंकडा ४५ भाग क्लोरिन सांपडावा. ह्यांतून फार दुर्गंध येतो. क्लोरेड ऑफ लाईम प्रथम थोडें पाण्यांत मिसळून दाट द्रावण करावें, नंतर मर्जी - नुरूप पाणी घालावें. ह्याच्या द्रावणानें धातूंची पात्रे झिजतात. मल व अन्य पदार्थांतील आल्ब्युमिनयुक्त घटक द्रव्यें ह्याने विरघळण्याकडे ह्यांतील भाग खर्ची पडल्यामुळे बॅक्टेरियाच्या नाशनार्थ ह्याचा पुरेसा भाग न उरल्यास बॅक्टेरिया जिवंत राहाण्याचा संभव असतो. कोरेंड ऑफ लेम कृमिघ्न व दुर्गंधिनाशक असण्याचें कारण असें आहे कीं, तो आई व आम्ल केल्यानें त्यापासून है प क्लोरस ( HCIO ) ऍसिड निर्माण होतें हैं। ऍसिड प्राणवायूशी संयोग घडविणारें आहे. कारण ह्याचें पृथ:करण होऊन हौ क्लोरिक (HCL) ऍसिड व प्राणवायु निर्माण होतात. जंतूंची प्रतिरोधक शक्ति अल्प असल्याचें ठाऊक नसल्यास ज्या पुडींतून शेंकडा अर्धा भाग क्लोरिन निघतो अशा पुडीचें शेंकडा १५ भागाचें द्रावण (ग्यालनाला २१ औंस) बहुधा वापरतात. १००० मध्ये एक भाग क्लोरिन पुरा होतो असे प्रयोगावरून आढळून येतें. दहा फूट लांब व रुंद खोली शुद्ध करावयाची असल्यास २० तोळे ब्लीचिंग पूड तीन पाव पाण्यांत मिसळून वापरावी. ·