पान:आरोग्यशास्त्र.pdf/२८५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

जंतुविचाराची मूलतत्त्वे २७७ रियांवर ह्याचें शेकडा ५ चें द्रावण योजावें. ह्यानें धातूंचीं पात्रें झिजतात. " बर्नेटस फ्ल्युइडमध्ये शेकडा ५० भाग Zinch, असतो. फेरस सल्फेट (Ferrous Sulphate) : - (Fe So, 7H, O.) ऊर्फ Green Copperas ह्याचें फेरिक सल्फेट होत असतांना त्यामध्ये ऑक्सिजन शोषला जातो. ह्यामुळे ह्याचें अांगीं प्रबळ दुर्गंध नाशक धर्म आहे. हा आमोनिया व सल्फ्युरेटेड हैड्रोजन शोषून घेतो. ह्याचे डाग पडतात म्हणून मळाच्या कामी हा उपयोगी पडतो. Fe Cl, ह्या पदार्थांचे सामान्य गुणमान फेरस सल्फेटप्रमाणें आहेत. परंतु ह्यामध्यें प्राणवायूशी संयुक्त होण्याचा धर्म कमी असतो. चिनोसोल, (Chinosol) : - ही सहज विद्राव्य स्फटिकमय पिवळी पूड आहे. ती क्किनोलिन वर्गापैकीं आहे. तिला थोडा मसालेदार वास येतो. तिचें द्रावण विषारी, त्यानें पात्रे झिजत नाहींत व आल्ब्यु- मिन गोठत नाहीं. तिच्या अंगीं मोठा दुर्गंधिनाशक धर्म आहे. तिचे १००० त १ चें द्रावण तितक्याच प्रमाणाचे परक्लोरेडचे द्रावणाइतकें परिणामकारक आहे असें प्रयोगांती पूर्णपणें सिद्ध झाले आहे. पोटॅशिअम परमँगनेट (Potassium Permanganate) ( K Mn 04 ) हें ऑक्सिजन - संयोगकारी द्रव्य आहे. व्यवहारांत ह्याचा मंद द्रावणाच्या दुर्गंधिनाशनार्थ उपयोग करतात. कारण प्रतिरोधक जंतूंच्या नाशनार्थ ह्याचें निदान शेंकडा ५ चें द्रावण वापरलें पाहिजे. ह्या प्रमाणांतील द्रावणाला खर्च अतिशय येतो व त्याचे डाग पडतात. शिवाय बॅक्टेरियाचा नाश होण्यापूर्वी सल्फ्युरेटेड हैड्रोजनसारखे वायु संयोगभंजक नामक ( Reducing Salts ) द्रावणें व अधिक अस्थिर सेंद्रिय पदार्थ प्रथम पोटॅशिअम परमँगनेटमधील ऑक्सिजन शोषून घेतात. Condy's Red Fluid "कॉडीज रेडल्फ्युईड" हैं परमँगॅनेट व सल्फेट ऑफ सोडा ह्यांच्या मिश्रणाचे द्रावण आहे.