पान:आरोग्यशास्त्र.pdf/२८६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२७८ आरोग्यशास्त्र फॉरमिक आल्डेड (Formic Aldehyde ) (CH, O) ह्याचें कडा १ ते २ प्रमाणांतील द्रावणाला झोंबणारा वास येतो. तें शीघ्रक्रिय व उच्च दर्जाचें दुर्गंधिनाशक व कृमिप्न आहे. बरोबरीनें जंतुनाशक कार्य करणाऱ्या कॅर्बालिक ऍसिडाच्या द्रावणापेक्षां ह्याचे द्रावणाला फार कमी किंमत पडते. आल्काहॉल मधून हैड्रोजन काढून घेतल्यानें आल्डेड होतो. जसें वुड स्पिरिट CH, OH मधून H, काढून घेतल्यानें CH, O हा Formic Aldehyde तयार होतो. हें नांव ठेवण्याचें कारण त्याचें जलदी रूपांतर होऊन फॉर्मिक ऍसिड ( CH, O2 ) बनतें. पाण्यांत शेंकडा ४० पर्यंत ह्याचें द्रात्रण करितां येतें. ह्या प्रमाणांत Formalin फॉर्मलिन नांवानें तें विकत मिळतें. सॅनिटस फ्ल्युइड (Sanitas Fluid) सॅनिटस ल्फ्युइडः न्ह्याय पैन नामक लांकडाचा गंध येतो. वापरण्यांत ह्याचा विषारी परिणाम घडत नाहीं. शेकडा १० प्रमाणांतील ह्याच्या जलांतील द्रावणानें १० मिनि- टांत स्पोअर नसलेले बॅक्टेरिया नाश पावतात. हें एक कमी योग्यतेचें कृमिनाशक आहे. वायुरूप कृमिघ्न द्रव्यें ( Gaseous Disinfectants:--) Formic Aldehyde फॉर्मिक आल्डेहैडचा वायूच्या स्वरूपांत देखील कृमिघ्न कार्यार्थ उपयोग करितात. आल्डेहैडच्या वाफा मोठ्या कृमिघ्न व दुर्गंधिनाशक आहेत. त्या विषारी नसतात, परंतु नेत्रांना व घशाला झोंबतात. ह्या वाफा पुरेशा प्रमाणांत खर्च केल्यानंतर जंतुघ्न पदार्थांत नेहमीच्या वहिवाटीत लागणारे सर्व धर्म ह्याचे अंगीं आहेत. समप्रमाणांत घेतल्यास सल्फ्यूरस ऍसिडच्या वाफेपेक्षां ह्याच्या वाफेनें अधिक जलदी कार्य होतें. ह्याच्यामुळे रंग व ( लोखंड व पोलादाशिवाय इतर ) धातूंचे पृष्ठभाग खराब होत नाहीत. परंतु मळाचे व रक्ताचे डाग ह्याने पक्के होतात. कोठडीचे आंत कोंबण्यास