पान:आरोग्यशास्त्र.pdf/२८७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

जंतुविचाराची मूलतत्वे २७९ थोडी अडचण पडते. परंतु ह्यापासून कांहीं धोका नसतो व खोल्या गच्च बंदोबस्त केल्यास ह्या वापरणें सोपें आहे. शेंकडा ७० आर्द्रतेमध्यें १७०° फॅ. उष्णमानावर फॉर्मलिनच्या वाफ अत्यंत परिणामकारक असतात. परंतु आर्द्रता व उष्णमान ह्यांपेक्षा फार कमी असली तर निर्जंतुकरण झाल्याची खात्री नसते. फॉर्मलिनची वाफ उत्पन्न करण्याचे प्रकार ट्रिलॅटचे ऍपरेटस्मध्ये ऑटोक्लोवांत दाबाखाली फॉर्मलिन तापवितात. त्याच्या द्रावणांत थोडा कॅलशियम् क्लोरैड घालतात. म्हणजे आल्डे हैडची कोरडी वाफ बाहेर पडते. कारण कॅलशियम् क्लोरैडची वाफ होण्यास १००° सें. उष्णमान लागतें व आल्डे हैडची वाफ कमी उष्णमानावर निघते. ऑटोक्कोत्रमध्ये ४० पौंडांचा दाब असल्याचें मापनाच्या काट्या- वरून दिसल्यावर लंब तांब्याच्या नळ्यांतून ह्या वाफा दूषित खोल्यांत सोडतात. ह्या ऍपरेटसूची सुमारें १८ पोंड किंमत असते. आवश्यक दाब उत्पन्न होण्यास सुमारे अर्धा तास लागतो व सामान्य आकाराच्या खोलींत ही वाफ पात्र तासपर्यंत सोडली पाहिजे. १००० क्यूबिक फूट जागेला ३ ते १ लिटर फॉर्मालिन लागतें व सुकूं नये म्हणून आटोक्लोत्रमध्ये थोडें फॉर्मलिन उरूं देतात. एक लिटर द्रावणांतून सर्व भाल्डेहैड बाहेर पडण्यास सुमारें २० मिनिटें लागतात. ह्याचें यंत्र अवजड असतें व गॅस उत्पन्न होण्यास वेळ लागतो. तरी हा प्रकार सर्वोत्तम आहे. आटनची कृति-- आल्डेहैडच्या वाफा उत्पन्न करण्यासाठी हजार क्यूबिक फूट जागेतील जंतुनाशनार्थ धातूच्या पात्रांत ५ औंस पोटॅशियम परमँगनेट ठेवतात. त्यावर रे पिंट फॉर्मलिन ओतावें. थोड्या वेळांत पोटॅशियम परमँगनेट व फॉर्मालिनमध्ये रासायनिक क्रिया सुरू