पान:आरोग्यशास्त्र.pdf/२८८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२८० आरोग्यशास्त्र होऊन बाकीच्या फॉर्मालिनची वाफ होण्यास लागणारी उष्णता उत्पन्न होते. सहा घंटेपर्यंत खोली गच्च बंद ठेवावी. सल्फ्यूरस ऍसिड (S02): - ह्याचें घनत्व हवेच्या दुप्पट असल्या- मुळे ह्या वाफा चांगल्या पसरत नाहीत. ह्यामध्ये रंग उडण्याचा फार थोडा अवगुण आहे, म्हणून वापरण्यास हरकत नाही. आर्द्रतेसह योजल्यास हें जोरदार जंतुघ्न आहे. ह्याच्या शेकडा ५ प्रमाणाचे द्रावणानें एॲक्सचे स्पोअर व शेकडा १ भागाचे द्रवणानें स्पोअर असलेले बॅक्टेरिया चोवीस तासांत मरतात. परंतु वाफेच्या रूपामध्ये कोथप्रतिबंधक धर्मापेक्षां ज्यास्त गुण यांत फारसा नाहीं. इतर ऑसिडाप्रमाणें हें आमोनिआ, कांपाउंड आमोनिआ व टोमेन्स इत्यादि सेंद्रिय पदार्थ शोषून घेतें, सल्फैड व सल्फ्युरेटेड हैड्रोजनचें. पृथ:करण करतें व हें बहुधा बॅक्टेरियांवर विषारी कार्य करतें. सल्फ्यूरस ऍसिडाने खोल्यांचे निर्जंतुकरण करण्याची रीत झपा- व्यानें मागे पडत चालली आहे. कारण आतां तितक्याच सोईच्या व अधिक परिणामकारक कृति उपलब्ध आहेत. पूर्वीच्या सामान्य कृतीच्या दोन अवस्था होत्या. (१) हवेत कडा एक दोन प्रमाणांत वायु सोडणे, (२) चोवीस तासपर्यंत कित्येक घंटेपर्यंत त्या जागेत भरपूर वातसंचार करणें धा प्रकारांत ही आवश्यक बाब आहे. ह्या वस्तूंची उत्पत्ति व उपयोग खालीं लिहिल्याप्रमाणें केला जाई:- (१) लोखंडाच्या पात्रांत गंधकाचे बारीक तुकडे घालून त्यांवर स्पिरिट ओतून पेटवीत. १००० क्यूबिक फूट जागेला २ रत्तल गंधक लागतो व त्यापासून शेंकडा सुमारें दोन भाग वायु उत्पन्न होतो. परंतु ह्या कृतीनें सर्व गंधक जळत नसे. म्हणून खाल अन्य प्रकार योजीत.