पान:आरोग्यशास्त्र.pdf/२८९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

जंतुविचाराची मूलतत्वे २८१ (२) नेहमींच्या बेंझालिन दिव्यांत कार्बन बायसल्फाईड घालावे. हे जळ- तांना सल्फ्यूरस ऍसिड बाहेर पडतें. (CS2 + 202 + CO2+SO2+S.) (३) गंधक एकाद्या ज्वालाग्राही पदार्थात मिसळून त्यांत घालून गोळा करून तो धातूच्या पात्राच्या आंत ठेवून त्यास बत्ती लावावी. हें मिश्रण सर्व जळून जातें. हें सोईस्कर व जलदी काम देणारें आहे... (४) वातावरणाच्या तिप्पट दाबानें (एक स्वोअर इंचावर ४५ रत्तल दाब) हा वायु द्रवरूप होतो. वीस औंसांच्या धातूच्या नळकांड्यांत हा ठेवतात. वापरण्याच्या वेळेस ह्या नळकांड्यांत जोडलेली एक लावलेली शिशाची लवचिक नळी तोडतात व तें नळकांडे उलटें करून उथळ भांड्यांत रिकामें करतात. द्रवावरील दाब नाहींसा झाल्यानें तो वायुरूप होतो. १००० क्यूबिक फूट जागेला २ नळकांडी लागतात. कारण एका नळकांड्या पासून तितक्या जागेतील हवेंत शेकडा एकापेक्षां किंचित् कमी इतकी वाफ उत्पन्न होते. एक नळकांड्यास १ शिलिंग पडतो. गंधक जाळल्यानें उत्पन्न होणाऱ्या वाफेइतकी ह्या द्रवाची वाफ परिणामकारक नाहीं असा प्रयोगांती अनुभव आला आहे. गंधक प्रचारांत असतांना आगीपासून दगे कचित् घडत असत. परंतु ते होऊं नयेत म्हणून जळत्या गंधकाचे पात्र पाण्याने भरलेल्या परातीत ठेवावें हें बरें. हें पाणी कडत असल्यास त्याची वाफ तेथील हवेंत शिरून गंधकाच्या धुरानें कृमिघ्न गुणांत तिनें भर पडते. गंधकाच्या धुरापासून जंतुघ्न कार्य होण्यासाठी हवेमध्ये पुरेशी आर्द्रता असली पाहिजे. परा- तीतल्या कढत पाण्यास गंधकाच्या जळत्या भांड्याची उष्णता लावून खोलींतील हवा वाफेनें भरून जाते व कृमिघ्न कार्य पूर्णपर्णे तडीस जाते. चोवीस तासांनीं खोली उघडल्यावर जमीन, भिंती व कडीपाट ह्यांवर पाण्याचे थेंब दिसतात. आंत पुरेशी वाफ व आर्द्रता होती असें