पान:आरोग्यशास्त्र.pdf/२९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पाणी २१ गृह्य जलशोधक (डोमेस्टिक फिल्टर्स ) - पाण्याचें अभिषव (डिस्टि- लेशन) केल्यानें पूर्ण शुद्ध जल तयार होतें. परंतु पाण्यापासून प्रथम होणारी वाफ बाहेर सोडून द्यावी लागते. कारण त्यांत मिश्र असे अशुद्ध वायु बाहेर टाकले पाहिजेत. ते आरंभीं निघणाऱ्या वायूबरोबर निघून जातात, परंतु अशा रीतीनें शुद्ध केल्यानें पाण्यास नेहमी असणारा व त्याला रुचि देणारा असा प्राणवायूही निघून जातो. तो त्यांत परत यावा म्हणून बाष्प निवाल्यानंतर अधोयंत्राचे तळांतलें पाणी बाहेर सोडतांना तें अनेक छिद्रांनीं व हळुहळू सोडावें म्हणजे त्यांत हवेंतील प्राणवायू मिश्र होतो. व जलाला चांगली रुचि येते. असली अधोयंत्रे मोठ्या शहरांत मिळतात. पाण्याला आधण आल्यानें त्यांतील कॅर्बानिक वायु व इतर वायुरूप पदार्थ निघून जातात. व विद्रावित खडू द्रावण स्थितींतून मोकळा होऊन भांड्यांचे तळीं बसतो. ह्या रीतीनें जल मृदु होतें व आधणाचे पाण्याचे उष्णतेनें त्यांत असणारे रोगजनक व इतर जंतु नाश पावतात. परंतु उकळल्यानें पाण्यांतील जंतूंची अंडी नाश पावत नाहींत, म्हणून एकदां उकळलेल्या पाण्यांतील अंड्यांपासून दुसरे दिवशीं कृमींची उत्पत्ति होईल. ह्यासाठीं रोज अर्धातासपर्यंत तेंच पाणी ओळीनें तीन दिवस उकळावें. रासायनिक द्रव्यांनीं उदकशुद्धीचे अनेक उपाय सुचविण्यांत येतात. ( १ ) सोडिअम सल्फैड - १ पैंट पाण्यांत १ ग्रॅम घातल्यास जंतूंचा नाश पुरतेपणीं होतो. ( २ ) तांबें - सूक्ष्म जंतु ताम्रपात्रांत जगत नाहींत. ह्यावरून पाण्यांतील कांहीं प्रकारचा वास नाहींसा करण्यास व जंतु - नाशार्थ तांब्याचे क्षारांचा उपयोग करतात. एक लक्ष शेर पाण्यांत आठ तोळे मोरचूद घातल्यास पाण्यांत माशांचे सारखी येणारी घाण नाहींशी होते. एक तोळा मोरचूद एक लक्ष तोळे पाण्यांत घातल्यास टैफॉइड ज्वराचे कृमि नाहींसे होतील. परंतु हें कार्य २४ तासांत नेहमी