पान:आरोग्यशास्त्र.pdf/२९०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२८२ आरोग्यशास्त्र समजावें. ज्वलनांत उत्पन्न झालेल्या उष्णतेनें गंधकाचा धूर विरळा होऊन चोहोंकडे पसरतो. ह्या धुराची उत्पत्ति जितक्या उंच स्थळी व जितक्या अधिक ठिकाणीं करवेल तितकी करावी, म्हणजे हा चोहोंकडे पसरतो व पसरण्याच्या पूर्वी याचा प्राणवायूशी संयोग होऊन रूपांतर होणार नाहीं. १००० क्यूबिक फूट जागेत ३ रत्तल गंधक वापरल्यास तेयें शेकडा ३ भाग धूर उत्पन्न होईल व चोवीस तासांनंतर तेथील जागेतील सर्व जंतूंचा संहार होईल. किडे व कीड नाहींशी केल्यास फॉर्मिक आल्डेहैडपेक्षां ह्या धुराचा कार अधिक उपयोग होतो. ह्या धुरांत मनुष्य गुदमरतो म्हणून त्याच्या खोलींत शिरून ती उघडणे कित्येक वेळां आवश्यक असतें. वॉशिंग सोड्याच्या पाण्याने ओला केलेला रुमाल तोंडावर धरून कामकऱ्याला सहज आंत जातां येतें. कार्से, तांबें व मिलटाच्या पदार्थावर ह्या वाफेनें डाग पडतात. म्हणून खोली शुद्ध कर- ण्याच्या पूर्वी असले पदार्थ काढतां आल्यास शेंकडा एक भागाच्या कॅर्बा- लिक ऍसिडच्या द्रावणानें ते पुसून खोलीच्या बाहेर ठेवावे. क्रोरिन Chlorine (Cl): - सल्फ्यूरस ऍसिडांतील बहुतेक अवगुण - ह्यांत आहेत. हा झोंबणारा, जड व कमी पसरणारा आहे. ह्याचें कार्य होण्यास आर्द्रता आवश्यक लागते. ह्यानें रंग उडून जातात. हा त्यापेक्षां महाग पडतो. पण ह्यांत जंतुघ्न धर्म अधिक आहे. क्लोरिनचीं हैड्रो- जनशी प्रीति असल्याने ह्याच्या अंगीं कृमिघ्न व जंतुनाशक धर्म आहेत. पाण्यांत विरघळल्यावर त्यांतील हैड्रोजनशीं संयोग पावून ताजा प्राण- वायू विशेषतः दिवसाच्या उजेडांत करतो. असला प्राणवायू बॅक्टेरिया व सेंद्रिय पदार्थांचा नाश करतो. (Cl. + H, O= 2HCI + O ) हा सल्फ्यूरेटेड हैड्रोजनचें पृथःकरण करतो. ( जसें Cl, + SH, =