पान:आरोग्यशास्त्र.pdf/२९१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

जंतुविचारावीं मूलतरवै २८३ 2HCl + S ) व अमोनियाचेंहि करतो. ( जसें 3Cl + 8NH = 6NH4 Cl + N, ). ब्लीचिंग पौडरवर सल्फ्यूरिक किंवा हैड्रोक्लोरिक ऍसिडाची क्रिया घडवून हा बहुधा तयार केला जातो. 1 १००० क्यूबिक फीट जागेला दोन रत्तल ब्लीचिंग पावडर व एक रचल गंधकाचा अशुद्ध तेजाब वापरावा. हे पदार्थ थोडे थोडे असे अनेक पात्रांत ओतावे व हीं पात्रे ठेववतील तितक्या उंच स्थळी ठेवावी. प्रतिरोधक जंतूंच्या नाशनार्थ ही पौडर फार अधिक प्रमाणांत बावी लागते, असें कांहीं प्रयोगांवरून दिसतें. ह्या पौडरमध्ये शेकडा ३५ भाग क्लोरिन हाती लागते. ही पूड दमट होऊं देऊं नये. धातूचें काढण्यासारखं सामान: - रेशमी पदार्थ इत्यादि जिन्नस खोलीं- तून अगोदर दूर करावेत व दारे उघडण्यासाठी आंत शिरतांना फार अडचण पडल्यास कामकऱ्यानें आमोनियाच्या मंद पाण्यांत भिजविलेला रुमाल तोंडावर धरावा. ब्रोमिन Bromine :-हा वायू जड आहे. हा क्लोरिनपेक्षां अधिक क्षोभक व अधिक खर्चाचा व त्याचा संपर्क होणाऱ्या पदार्थांचा अधिक नुकसानकारक आहे. लिक्विड ब्रोमिन नांवाच्या उडून जाणाऱ्या द्रवा- पासून हा सहज बाहेर पडतो. ह्याची जंतुघ्न क्रिया होण्यास आर्द्रतेची आवश्यकता आहे. आडोडम lodim:-हा वायु हवेपेक्षां आठपट जड आहे व कोरिन - पेक्षा तिप्पटीहून जड आहे. हैड्रोक्लोरिक ऍसिड Hydrochloric Acid (HCl ):-ह्याची बाफ जंतुनाशनार्थ देण्याबद्दल कोणी लिहितात. इतर कांहीं अम्मला- प्रमाणें ह्यांत मोठा कृमिघ्न गुण आहे. ह्याचें मुख्य कारण फार आम्लता कृमीच्या अस्तित्वास विघातक असते.