पान:आरोग्यशास्त्र.pdf/२९३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

जंतुविचाराची मूलतत्त्वें २८५ ऍसिड थोडें उरतें. ज्या पुडींत चुना नसतो पण शेकडा निदान १५ भाग ऍसिड असतें ती उत्तम प्रकारची समजावी. असल्या पुडीत वाळूची पूड किंवा गारगोटीची पूड (कॅबलेटेड पौडर) द्रवांश शोषून घेणाऱ्या वनस्पतीच्या धान्याची पूड अथवा दगडी कोळशाचे पीठ (पावडर) असतें. ह्या सर्व पुड्यांतून कालगतीप्रमाणे शेकडा १ ते २ भाग कॅर्बालिक ऍसिड उडून जातें. विरघळलेला चुना चांगला दुर्गंधिनाशक आहे. तो सल्फ्युरेटेड हैड्रोजन व बहुतेक प्रकारचे सेंद्रिय पदार्थांचे दुर्गंध शोषून घेतो. ब्लीचिंग पौडरप्रमाणें तो भाजतो व धातूचें नुकसान करतो. " सॅनि- टास पौडर " व चुन्याचें समभाग मिश्रण दुर्गविनाशनार्थ चांगले आहे व स्वतः ह्याचा वास वाईट नसून बरा येतो.


..कोळसा :-- ह्यानें भिन्न वायू शोषले जातात व तेथें असलेल्या घनी- भूत प्राणवायूशी त्याचा संयोग होऊन इष्ट रूपांतर होते. परंतु कोळसा ताजा व कोरडा वापरला पाहिजे. सात्रणः– साध्या साबणांत कृमिघ्न गुण असतात. औषधी साब- णांत कृमिघ्न पदार्थ अल्प प्रमागांत घातल्यास त्यांचा अधिक उपयोग होत नाहीं. जंतुनाश करण्याच्या व्यवहारोपयोगी रीती जी कृमिनाशक द्रव्ये आपण वापरतों तीं ताकदवान आहेत किंवा नाहीत व जंतुनाशनाचे कामांत व्यत्यय आणण्यासारखे कांहीं एक घडूं नये ह्या गोष्टीकडे मुख्यतः लक्ष पुरविलें पाहिजे. आल्ब्युमिनयुक्त द्रव्याचें अस्तित्व, ज्याचें जंतुनाशन करावयाचे त्याचा प्रकर व स्थिती आणि जंतुनाशन करण्यास जें पाणी वापरावयाचें त्याची शुद्धता ह्या बाबी लक्षांत घ्याव्या. कठीण जलानें जंतुनाशक द्रव्याचे गुणति फार