पान:आरोग्यशास्त्र.pdf/२९५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

जीवित्वनोंद २८७ ६. जंतुनाशनाच्या कामाची पुनरावृत्ती करावी. कामकऱ्यांनी रबराच्या कापडाचे पायघोळ अंगरखे व त्याच कापडाची टोपी घालून काम करावें. रसकापराचें द्रावण एक हजारांत १ प्रमाणाचें चिनो- सोलाचें बारात एक, फर्मालिनचे ४०० त एक, कॅर्बालिक ॲसिडाचें १०० त ५ ह्या प्रमाणांचीं द्रावणें जंतुनाशनार्थ उपयोगी पडतात. रोगोत्तर क्षीणावस्थेत किंवा रोग्याचे मृत्यूनंतर जंतुनाशनाचे काम करावें. (२) गंधक वगैरेंचा धूर इत्यादि वायुरूप द्रव्यांचा फारसा उपयोग होत नाहीं. वरप्रमाणे जंतुनाशनाचे काम झाल्यावर ह्या कामांत मदत म्हणून वाटल्यास धुराचा उपयोग करावा. प्रकरण १३ वें जीवित्वनोंद ( व्हॅटल स्टॅटिस्टिक्स् ) दहा दहा वर्षांनीं खानेसुमारी करणें व नेहमीं जन्ममृत्यूंची नोंद करणें ह्यांपासून अनेक फायदे आहेत. खानेसुमारी हा जीवितासंबंधी अनेक नोंदींचा पाया आहे. खानेसुमारी बिनचूक केली गेली पाहिजे. ह्या कामी जनतेनें अधिकान्यांशीं पूर्ण सहकारितेनें वागले पाहिजे. खानेसुमारीने देशाचे लोकसंख्येची वाढ किंवा घट व लोकांचे आरोग्या- संबंधी दुसरी अनेक प्रकारची उपयुक्त माहिती मिळते, वह्या माहितीवरून जनतेच्या आरोग्याची सुधारणा करण्यासाठी योग्य मार्ग सांपडतात. खानेसुमारीचे आंकडे हातांत आल्यावर जन्ममृत्यूचे नोंदीपासून पुष्कळ तऱ्हेची उपयुक्त माहिती मिळते. त्यापैकीं कांहीं प्रकारच्या उपयोगांचा उल्लेख खाली केला आहे. त्यापासून लोकांचे आरोग्याची