पान:आरोग्यशास्त्र.pdf/२९७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

जीवित्व नोंद २८९ कारणांत ज्वर दाखवितात. परंतु ज्वर हा प्रधान व्याधि कमी वेळां असतो. अनेक वेळा ज्वर इतर रोगांचें फक्त एक लक्षण असतें. मयताचें वय माहीत नसल्यानें वयाची माहिती अनेक वेळां चुकीची असते. लोकांच्या आरोग्याची स्थिति समजण्यास मृत्युसंख्येचें प्रमाण हें एक चांगलें साधन आहे. एका वर्षांत दर हजार माणशी किती मृत्यु होतात त्याचा अकिडा आरोग्यासंबंधी पत्रकांत दाखवितात. सरकारनें आरोग्याची काळजी घेतल्यानें मृत्युसंख्येचे प्रमाण कमी होतें. शिक्षण, सांपत्तिक सुधारणा ह्यांमुळें तें कमी होतें. सुधारलेल्या देशांत मृत्यूचे प्रमाण अकरापर्यंत होईल तर तें चांगलें प्रमाण मानलेले आहे. खेड्यांमध्ये हें प्रमाग कमी असतें व शहरांत ज्यास्त असतें. शहरांत हजारी सतरा हैं प्रमाण बरें असें समजावें. निरनिराळ्या मृत्युसंख्येच्या प्रमाणांची तुलना नेहमीं बरोबर होणार नाहीं. कारण ज्या शहरांत मुलांची किंवा वृद्धांची संख्या ज्यास्त असेल तेथें प्रमाण ज्यास्त होईल व ज्या नगरांत तरुणांची संख्या ज्यास्त असेल तेथें तें कमी होईल. खालीं लिहिलेल्या शहरांत दर हजारीं माणशी मृत्यूचें प्रमाण पुढें लिहिल्याप्रमाणें आहे. मुंबई २६, मद्रास ४२, कलकत्ता २७. एकंदर मृत्यूच्या प्रमाणाबरोबर वयाच्या संबंधानें मृत्यूची संख्या समजणें अवश्य आहे. पांच वर्षांच्या आंत बालकांची मृत्युसंख्या नेहमीं अधिक असते. मृत्युसंख्येपैकीं शेंकडा ४० ते ५० प्रमाण ५ वर्षांच्या आंतील मुलांचें असतें. ह्यापैकी पहिल्या तीन वर्षांत ज्यास्त असतें. व दीड वर्षांत तर फारच असतें. कलकत्त्यांतील एका सालांतील १२, ३८२ मृत्यूंपैकीं ६, ५२७ मृत्यु ५ वर्षांच्या आंतील मुलांमध्ये झाले. जन्मापासून ५० वर्षांपर्यंत जसजसे वय वाढत जातें तसतसें मृत्यूचे प्रमाण कमी होत असतें. हें मुंबई म्युनिसिपलिटीचे रिपोर्ट- वरून दिसून येईल. १९