पान:आरोग्यशास्त्र.pdf/२९९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

जीवित्व नोंद २९१ अधिक असते म्हणून गरिबांच्या मुलांपेक्षां श्रीमंतांचीं मुलें कभी मृत्यु पावतात. पुरुषांना कष्टाचीं व धोक्याचीं कामें करावी लागतात, म्हणून त्यांच्या जीवित्वाचा भरंवसा स्त्रियांच्यापेक्षां कमी असतो. परंतु गरोदरपणा व प्रसूति हीं स्त्रियांना धोक्याची कारणें आहेत. जनवस्तींत आजाराचें प्रमाण समजणें अगत्याचें आहे. किती मनुष्यें निरोगी राहतात व किती सदोदित आजारी राहतात हें ठरविणें फार अवघड आहे. आजारी पडलेल्या लोकांपैकी किती बरे होतात व किती मरतात ही माहिती महत्त्वाची आहे. मृत्यूंची संख्या व मृत्यु कोणत्या वयांत होतात हे समजलें पाहिजे. त्याचप्रमाणे कोणत्या रोगाने होतात हे ठाऊक असावें. बालकांत मृत्यु यकृताचे व फुप्फुसाचे विकार, अपस्मार, जुलाब, दंतोद्भव इत्यादि रोगांनी होतात. देवी, गोवर, डांग्या खोकला इत्यादि सांसर्गिक रोगांनी मुलें मृ यु पावतात. संधिवात, हृद, फुप्फुस, यकृत व मूत्रपिंडाचे विकार ह्रीं वार्धक्यांत मृत्यु येण्याचीं मुख्य कारणे आहेत. मृत्युसंख्येत न्यूनाधिक होण्याचीं अनेक प्रकारची कारणें आहेत. सांपत्तिक स्थिति चांगली असल्यास हें प्रमाण कमी असतें. स्वस्ताईंत लग्नें व जन्म अधिक होतात. दुष्कळांत मृत्यु ज्यास्त होतात. दिवसाचा भाग व ऋतू ह्यांचा मृत्यूवर बराच परिणाम होतो. रात्रीं व निद्रावस्थेत जैवी शक्ति क्षीण असतात. म्हणून रात्री मृत्यु ज्यास्त होतात. गारठा व उष्णता अधिक असते अशा ऋतूंत व अशा देशांत मृत्यूचें प्रमाण ज्यास्त असतें. उजेड, वाताभिसरण, जमिनीचा कोरडेपणा ह्यांचा आरोग्यावर पुष्कळ परिणाम घडतो. म्हणून खेड्यांपेक्षां शहरांत व कोरड्या जागे- पेक्षां व प्रदेशापेक्षां दमट जागेत व दलदलीच्या मुलुखांत मृत्यूंचे प्रमाण ज्यास्त असतें. शिक्षणाच्या प्रसारामुळे आरोग्यरक्षणाकडे ज्यास्त लक्ष