पान:आरोग्यशास्त्र.pdf/३०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२२ आरोग्यशास्त्र उरकेल किंवा नाहीं ह्याबद्दल मतभेद आहे. तांब्याचे लहानलहान तुकडे १२ घंटेपर्यंत पाण्यांत टाकून ठेवल्यास टैफॉईडचे जंतु नाश पावतात. हेंच कार्य तांब्याचे भांड्यांत पाणी सांठविल्यानें होतें. ह्या रीतीनें शुद्ध झालेल्या पाण्यांतील बहुतेक ताम्र अविद्राव्य स्थितीत तळीं बसतें. परंतु उदकांत अल्प प्रमाणांत राहिली तरी ताम्रासारखी जलाल धातु मानव शरीरावर किती दुष्परिणाम करते ह्याबद्दल अधिक अनुभव मिळाल्या शिवाय ह्या रीतीचा उपयोग करण्याबद्दल अशंकपणें शिफारस करतां येत नाहीं. ए (३) तुरटी (अॅलम ) हिचा उपयोग कधीं कधीं जलशुद्धीसाठी करितात. ह्या उपायानें तुरटीबरोबर गाळ मात्र पाण्याचे तळीं बसतो. त्यांतील जंतूंवर कांहीं कार्य घडत नाहीं. वीस शेर पाण्यांत तुरटीची चवलीभर पूड घालतात. फिल्टर (जलशोधक):-(१) कौटुंबिक जलशोधकापासून उपायापेक्षां अपाय फार होतो. कारण, एकदां विकत घेतल्यावर शोधक देखील साफसूफ केला तरच त्यापासून जलशुद्धि होईल हैं कोणाचे ध्यानांत राह नाहीं. त्यांतील शोधक द्रव्यें बहुधा कोणी धूत नाहीं; किंवा त्यावर कोणी अग्निसंस्कार करीत नाहीं. ह्यामुळे सडणारी प्राणिज द्रव्यें व सूक्ष्म जंतु त्यांतील रंत्रांमध्ये पुष्कळ सांठतात, व ते जंतु अधिक होतात; म्हणून न गाळलेल्या जलापेक्षां शोधित जलांत कधीं कधीं अधिक जंतु सांपड- तात. शोधकांत कोळसा असल्यास, त्यांतून प्राणिज कोळसा असल्यास, ही स्थिति होण्याचा अधिक संभव असतो. कोळशापासून प्राणिज पदार्थांचें ऑक्सिडेशन झाल्यानें त्यांचा नाश होतो हें खरें. परंतु तो जर कांहीं काळानें पालटला नाहीं, किंवा धुवून अगर चांगला भाजून मधून मधून स्वच्छ केला नाहीं तर, त्यांतील गुणांचा लोप होतो; प्राणिज कोळशापासून फॉस्फेट ऑफ लैमचा अंश जलास पोचतो व हें द्रव्य