पान:आरोग्यशास्त्र.pdf/३०२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२९४ आरोग्यशास्त्र संख्येची सरासरी त्या महिन्यांत असते. सबंध लोकसंख्येच्या दर हजा- रावर जन्माचें प्रमाण काढण्याची वाहिवाट आहे. परंतु १५ ते ४० ह्या गर्भधारणेस योग्य वयाच्या स्त्रियांच्या दर हजारावर जन्माचें प्रमाण काढणें अधिक बरोबर होईल. मोठ्या शहराच्या मृत्यूचे प्रमाण काढतांना हॉस्पिटल, कारखाने इत्यादींमध्ये मरण पावणा-यांपैकी जे लोक शहराबाहेरून नोकरीसाठीं येतात त्यांची संख्या वजा केली पाहिजे. सबंध वस्तीच्या मृत्यूचें प्रमाण ठरविलें तरी पांच वर्षांच्या आंतील व पन्नास वर्षांच्या पुढील वयांत मृत्यूचें प्रमाण फार अधिक असतें. इकडे दुर्लक्ष करता कामा नये. खानेसुमारीत स्त्रीजातीची संख्या अधिक भरते. जन्ममृत्यूची प्रमाणें अल्पमुदतीचीं न काढतां सबंध सालाचीं काढावीत, म्हणजे त्यांत चूक राहण्याचा संभव कमी राहील. एकाच शहरांतील निरनिराळ्या भागांत मृत्युसंख्येचें प्रमाण भिन्न असतें. ज्या पेठेत कोंदट, दमट, अंधेरी व दाटीनें वसलेलीं घरें असतात त्या पेठेत मृत्युसंख्येचें प्रमाण जास्त असतें. ह्या कारणामुळें व अनीतीच्या वर्तनानें खेड्यांपेक्षां शहरांत हे प्रमाण जास्त असतें. शेती व असल्या खुल्या हवेंतील धंदे व साधी रहाणी ह्यांमुळे खेड्यांत तें कमी असतें. स्पर्शसंचारी विकारांपासून होणाऱ्या मृत्युसंख्येवरून एखाद्या देशाच्या अथवा शहराच्या आरोग्याच्या परिस्थितीचें ज्ञान होतें. त्याचप्रमाणें तान्ह्या लेकरांच्या व वयाच्या पांच वर्षांखालील मुलांच्या मृत्युसंख्येच्या प्रमाणावरून जनतेच्या आरोग्याच्या स्थितीचें ज्ञान होतें. एका पिढीचा संसार जन्मापासून मृत्यूपर्यंत कोणत्या मानानें होती हैं दाखविण्यासाठी आयुष्याचे तक्ते कांहीं शोधकांनी तयार केले आहेत. उपजलेल्या मानवाच्या आयुर्मर्यादेच्या सरासरीचें ज्ञान त्यावरून होतें. त्याचप्रमाणें अमुक वयाचा मनुष्य किती वर्षे जगेल ह्याचा त्यावरून अदमास होतो.