पान:आरोग्यशास्त्र.pdf/३०३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

जीवित्व नोंद २९५ सुधारलेल्या व भरभराट असलेल्या देशांत आरोग्यशास्त्राचे नियमांचें अवलंबन अधिक होत असल्यानें व रोगचिकित्सा वेळेवर व अधिक कुशलतेनें होते म्हणून मृत्युसंख्येचे प्रमाण सालोसाल कमी होतें, व जन्माचें प्रमाण अधिक होतें. इ. स. १८९९ त इंग्लंडमध्यें मृत्यु- संख्येचें प्रमाण दर हजारी १६३ होतें व १९१० मध्ये तें १०५ झालें. आरोग्यसंबंधीं पत्रकांवरून आणखीहि उपयुक्त माहिती मिळते. मुलींपेक्षां मुलगे जास्त जन्मतात. लहानपणांत मुलींपेक्षां मुलगे जास्त मृत्यु पावतात. लहान वर्यात लग्न झालें असतां संतती कमी होते, ती रोगट असते व त्यांत मृत्यूचें प्रमाण ज्यास्त असतें. पुरुष व स्त्री सारख्या वयाचीं असली किंवा पुरुष स्त्रीपेक्षां १६ वर्षांनीं ज्यास्त असला तरी संतती कमी होते. स्त्रियांना संतान होण्याचा काल ४८ ते ५० वर्षांच्या पुढें बंद होतो. इंग्लंड देशांत लग्नांतील सरासरी वय पुरु- षांत २५ वर्षांचें व स्त्रीचें २४ वर्षांचें असतें. त्या देशांत २१ हें प्रौढ वय मानतात. त्या वयाचे अगोदर लग्नें होऊं शकतील परंतु तीं पाल- कांच्या अथवा आईबापांच्या परवानगीने व्हावीं लागतात. नाहींतर तीं कायदेशीर समजली जात नाहींत. हिंदुस्थान देशांत लग्नासंबंधानें वयाची ईयत्ता कायद्याने ठरविलेली नव्हती. लेकरूं पाळण्यांत असल्या- पासून पुढे कोणत्याहि वयांत लग्नें होऊं शकत. परंतु १९२९ मध्ये शारदा कायद्याने लग्नाच्या वेळी मुलीचें वय १४ व मुलाचें वय १८ असावें असें ठरविलें आहे.