पान:आरोग्यशास्त्र.pdf/३०४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण १४ वें आरोग्याचे कायदेकानू व त्यची अंमलबजावणी ह्या प्रकरणांत इंग्लंड देशांत आरोग्यरक्षणार्थ चालू असलेल्या कायद्यांचा गोषवारा दिला आहे. सुधारलेली राष्ट्र आरोग्यास किती जपतात; घरें, दारें, गांवें, रस्ते व शहरें साफसूफ ठेवण्याची किती खबरदारी घेतात; त्यांच्या मानानें आम्ही किती गलिच्छपणानें राहतों, व आमच्या राहण्यांत सुधारणा किती अवश्यक आहे इत्यादि गोष्टी समजाव्या म्हणून ह्या विषयावर आम्ही लिहीत आहों. ह्यापासून सध्यांच्या म्युनि- सिपल अधिकाऱ्यांनी तर पुष्कळ बोध घेण्यासारखा आहे, पण तरुण पिढीच्या मनावर ह्याचा ठसा उमटल्यास ते आरोग्यसुधारणेचें काम आस्थेने व नेटानें हातीं घेतील. इंग्लंड देशांत आरोग्यरक्षणार्थ पार्लमेंट कायदे करतें; ह्या बाबतींत तेथील प्रत्येक कोर्टाला मुख्य अधिकारी दिले आहेत. प्रत्येक कौंटीला एक लोकल गव्हर्नमेंट बोर्ड असतें व ह्या बोर्डचे अधिकारांत त्या भागां- 'तील गांवें व शहरे असतात. शहराच्या म्युनिसिपॅलिटीने किंवा खेड्याचे सॅनिटरी कमिटीनें सफाईच्या कामांत कुचराई केल्यास तें काम लोकल गव्हमेंट बोर्ड करतें व झालेला खर्च कमिट्यांकडून भरून घेते. लो. ग. बोर्डाकडे कमिट्यांवर अपिलें चालतात. व ह्या सर्वांच्यावर होम सेक्रेटरी हा प्रधान असतो. म्युनिसिपल कमिटी व सॅनिटरी कमिटी ह्यांच्या फिर्यादी झटपट अधिकाराच्या ( समरी पॉवर ) मॅजिस्ट्रेट पुढे चालतात. त्या देशांत निरनिराळ्या कमिट्या सहकारितेनें वागतात. हिंदुस्थान देशांत पैशाची उणीव असल्यामुळे सुधारलेल्या देशां- प्रमाणें आरोग्यासंबंधीं सुधारणा होणें अवघड आहे. तरी पण लोकांनी