पान:आरोग्यशास्त्र.pdf/३०५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

आरोग्याचे कायदेकानू व त्यांची अंमलबजावणी २९७ सहानुभूतीनें वागून ह्या कामी अधिक लक्ष पुरविले व म्युनिसिपल च इतर अधिकारी आपल्या कर्तव्यास जागले तर आरोग्याच्या बाबतींत फार फार सुधारणा होतील ह्यांत संशय नाहीं. असें झाल्यास जनतेचे आरोग्य वाढून रोगराई व मृत्युसंख्या कमी होईल. जेव्हां आरोग्यविघातक गोष्टींपासून घडणारा अपाय फक्त त्या कर- णाऱ्या इसमाला पोहोचतो, तेव्हां कायद्याच्या बंधनाचें कारण पडत नाहीं. परंतु जेव्हां आशा गोष्टींपासून शहरांतील किंवा पेठेतील लोकांना अपाय होण्याचा संभव असतो, तेव्हां त्या गोष्टी न घडूं देण्याची व्यवस्था कायद्याने करावी लागते. जनतेचें आरोग्यरक्षण हें म्युनिसि पॅलिटीचे व सॅनिटरी कमिटीचें एक प्रमुख कर्तव्य आहे. लोकांनीं आरोग्यविघातक गोष्टी करूं नयेत म्हणून त्यांना आरोग्याच्या काय- द्याची अंमलबजावणी करण्याचा अधिकार देण्यांत येतो. त्याचप्रमाणें आपआपल्या सोयीप्रमाणें पोटकायदे करून त्यांची बजावणी करण्याचा अधिकार असतो. रस्ते, गटारें इत्यादि साफसूफ ठेवणे, रात्रीं रोषनाई करणें, मल- मूत्रादि द्रव्ये व केरकचरा गांवाबाहेर नेऊन त्यांची विल्हेवाट लावणें, औषधपाण्याची सोय करणें, शिक्षण देणें इत्यादि प्रकारची त्यांचीं कर्तव्यें आहेत. सांसर्गिक रोगांची माहिती मिळविणें, असल्या रोगांपासून प्रस्त लोकांना हॉस्पिटलमध्ये नेणें, दूषित इमारती व सामानांचें निर्जंतु- करण करणें, दूषित दूध व खाद्य पदार्थांच्या विक्रीस प्रतिबंध करणें ही त्यांचीं कामें आहेत. ह्या गोष्टी घडवून आणण्यास अधिकारी नेमिलेले असतात. मोठ्या म्युनिसिपल कमिटीला एक आरोग्यरक्षक अधिकारी (हेल्थ ऑफिसर) व कित्येक आरोग्याचे ( सॅनिटरी ) इन्स्पेक्टर असतात. लहान कमिटीला एक आरोग्याचा इन्स्पेक्टर असतो. ह्या अधिकाऱ्यांना