पान:आरोग्यशास्त्र.pdf/३०६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२९८ आरोग्यशास्त्र म्युनिसिपल कमिटीची आरोग्यासंबंधीं कर्तव्यें बजावावी लागतात. योग्य आगाऊ सूचना देऊन खाजगी घरांची व कारखान्यांची तपासणी करण्याचा अधिकार त्यांना असतो. सर्व शहराचें मैलापाणी व सांडपाणी शहराच्या बाहेर नेऊन त्याची विल्हेवाट लावणें हें म्युनिसिपलिटीचें कर्तव्य आहे. प्रत्येक घरवाल्यास आपल्या घराची मोरी बांधून कमिटीच्या गटारांत सोडण्यास लावण्याचा अधिकार कमिटीला आहे. परंतु सार्वजनिक गटार घरापासून शंभर फुटांपेक्षां ज्यास्त दूर नसावें. लेखी परवानगीशिवाय सार्वजनिक गटारावर घर बांधण्याची मनाई असते. घराचे तारदखाने साफ राहतील असे पक्के बांधिले पाहिजेत व त्यांत पडणारे पाणी व इतर द्रव पदार्थ तेथें न झिरपतां मोठ्या आका- राच्या पक्क्या कोंडीत पडतील अशी व्यवस्था केली पाहिजे. हें सांड- पाणी रोजच्यारोज कमिटीनें शहराबाहेर न्यावयाचें असतें. आरोग्यनाशक स्थिति (न्युइसन्स ) आरोग्यास प्रत्यक्ष अपाय करणारी किंवा अपाय करणाऱ्या लागीची अशा स्थितीला आरोग्यनाशक स्थिति असें म्हणतात. आरोग्यनाशक स्थितीचीं कांहीं उदाहरणें खाली दिली आहेत. १. राइातें घर अगर परड्यांतील सोपा प्रकृतीस अपायकारक होईल अशा स्थितीत राखणें; तसेच, पडीक घरें, ओल, अंधेर, पिसवांचा व ढेकणांचा अतिरेक. २. कोणत्याहि गटार, तारदखाना अगर अंगणांत रहाणाऱ्या इसमांच्या अगर शेजाऱ्यापाजाऱ्यांच्या प्रकृतीस अपायकारक होण्याचा संभव असेल असे गलिच्छ ठेवणें. ह्यासंबंधीं पोटकायद्याने घराच्या अंगणांत पाण्याची डबकों राहूं नयेत म्हणून फरसबंदी करावयास लावतां येते. ३. ज्या रीतीनें आरोग्य बिघडेल अशा रीतीनें पाळलेले जनावर.