पान:आरोग्यशास्त्र.pdf/३०७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

आरोग्याचे कायदेकानू व त्यांची अंमलबजावणी २९९ ४. केरकचरा, खरीब, राखोडा इत्यादि जमविणें. परंतु कारखान्या -- संबंधी कचरा व्यापाराचे सोईपेक्षां अधिक काल राहात नसल्यास व प्रकृतीस अपाय न होण्याबद्दल शक्य ते उपाय केल्यास तो पडत गेला तरी चालतो. ५. ज्या घरांत किंवा ज्या घराच्या भागांत दाटीनें मनुष्यें राहतात असे. घर. प्रत्येक घरांत दरमाणशीं निदान तीनशे ते चारशें घन फूट मोकळी जागा पाहिजे. मुलांना निम्मी असावी. ६. खाजगी पाण्याचा हौद, त्याची जागा व बांधकाम किंवा त्यांतील पाण्याची स्थिति हानिकारक असणें हें व सर्व भागाची तपासणी म्युनिसिपल कमिटीनें व सॅनिटरी कमिटीने मधून मधून ठेविली पाहिजे व आरोग्यनाशक स्थिति दूर करविली पाहिजे. ह्यासाठीं जागेच्या मालकास आगाऊ सूचना देऊन सकाळी ६ ते संध्याकाळी ६ पर्यंत आरोग्यखात्याच्या अधिकान्याला कोणत्याहि घरांत तपासणीसाठी जाता येतें. कारखान्याची तपासणी कोणत्याहि काळीं करतां येते. आरोग्यनाशक स्थिति दूर करण्यासाठीं अपराध्यास नोटीस देण्यांत येते व ती अमान्य केल्यास मॅजिस्ट्रेटच्या मदतीनें तें काम करून घेण्यांत येते. आरोग्यनाशक स्थितीसंबंधीं इलाज आरोग्यनाशक स्थितीसंबंधीं फिर्याद खालीलपैकी कोणालाहि करितां येते. ज्यास उपद्रव होतो असा इसम, स्थानिक सरकारचा कोण- ताहि कायमचा अथवा हंगामी अधिकारी अथवा पोलीस अधिकारी ह्यांपैकी कोणीहि फिर्याद करावी. अशी फिर्याद आल्यावर कमिटी - सॅनिटरी इन्स्पेक्टरला त्या फिर्यादीच्या शोधासाठीं पाठविते. त्यानें वरील संस्थेच्या पुढील बैठकीला चौकशीबद्दल रिपोर्ट केला पाहिजे. त्या "