पान:आरोग्यशास्त्र.pdf/३०९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

आरोग्याचे कायदेकानू व त्यांची अंमलबजावणी ३०१ आहे. प्रत्येक घरवाल्यानें पाण्याचा नळ विकत घेतला पाहिजे; दरेक घराला तारदखाना पाहिजे. घरांत दुसरें बिन्हाड -- परकीय कुटुंबाचें विन्हाड - बिन्हाड असलेल्या घराबद्दल पोटकायदे करण्याचा अधिकार स्थानिक सरकारास असतो. किती माणसांचें परकीय बिन्हाड घेणे, असल्या घराची नोंद व तपासणी ठेवणें, त्यांत वाताभिसरण व स्वच्छ हवा ठेवणें व वर्षांतून एकदां सफेती देणें इत्यादींबद्दल कायदे करण्यांत येतात. गलिच्छ धंदे रक्त उकळणे, अस्थी उकळणें, साबण झिजविणें, चरबी उक- चामडी तयार करणें व रंगविणें, सरस करणें व रक्त सुकविणें, आंतडीं खरबडणें इत्यादि 'कामें गलिच्छ धंद्यांत येतात. ळणें व काढणें, चरबीचें साबण शिजविणें, असल्या धंद्यांचे कारखाने नवीन सुरूं करावयाचे झाल्यास स्थानिक सरकारची आगाऊ परवानगी घेतली पाहिजे. तसें न केल्यास गुन्हेगारास एकदम दंड होतो व तें काम बंद करीपर्यंत रोजचा काही दंड भरावा लागतो. गलिच्छ धंद्यांस लागणारें सामान बंदिस्त पात्रांत ठेवणें, असल्या धंद्यांत होणाऱ्या वाफा भट्टींत जाळून जाण्याची व्यवस्था करणें, सांड- पाणी इत्यादींना पुरेशा मोन्या व गटारें करणें, भुई स्वच्छ ठेवणें, अधून मधून भिंतीस चिकटलेले पदार्थ खरडून काढणें, मोकळी झालेलीं भांडी धुणे, सॅनिटरी इन्स्पेक्टरला तपासतां येण्यासारखी जागा बांधणें इत्यादि संबंधी पोटकायदे करितां येतात. अयोग्य अन्न विकावयास आणलेलीं अथवा विक्रीसाठीं सांठविलेलीं फळे, भाज्या, दूध, धान्य, पीठ, मांस, कोंबडीं, जिवंत व मृत जनावरें यांची तपा-