पान:आरोग्यशास्त्र.pdf/३१०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३०२. आरोग्यशास्त्र सणी करण्याचा अधिकार सॅनिटरी इन्स्पेक्टरला असतो. ह्यांपैकीं एखादा पदार्थ खाण्यास अयोग्य व जनावरें रोगट आढळून आल्यास तीं जप्त करून मॅजिस्ट्रेटकडे नेण्याचा त्यास अधिकार आहे. मॅजिस्ट्रेट ते जिन्नस अयोग्य दिसल्यास तसें ठरवून त्यांचा नाश करण्याचा हुकूम करतो. नंतर त्या जिनसांच्या मालकावर फिर्याद होऊन त्याला जबर दंड अथवा तीन महिने कैद सांगण्यांत येते. सॅनिटरी इन्स्पे- कटरच्या कामांत अडथळा करणाऱ्याला दंड होतो. वरील जिन्नस तपा- सावयास येणाऱ्या इन्स्पेक्टरास मालकाने प्रतिबंध केल्यास त्याने मॅजिस्ट्रेट- पुढे वरील प्रतिबंधाबद्दल शपथेवर तक्रार करावी म्हणजे त्यास घराची तपासणी करण्याचें वारंट देण्यांत येतें. असें वारंट असतांनाहि प्रतिबंध झाल्यास गुन्हेगारास चौपट दंड पडतो. सॅनिटरी इन्स्पेक्टरची तक्रार नसतांनाहि मॅजिस्ट्रेटला वरील प्रकारचे पदार्थ अयोग्य असल्यास तसे ठरवितां येतें. कसाईखाने ज्या जागेत लोकांना विकण्यासाठी जनावरांचा वध करतात, त्यास कसाईखाने म्हणतात. कसाईखाने म्युनिसिपलिटीनें बांधावे व त्यांची स्वच्छता व त्यांसंबंधीं कर घेण्याचे नियम करावेत. खाजगी घरांत असली कामे करावयाची झाल्यास कमिटीचें लायसेन्स मिळविलें पाहिजे च तेथें कसाईखाना असल्याची पाटी प्रमुख जागीं लाविली पाहिजे. वस्तींतील इमारतींपासून कसाईखाना निदान शंभर फूट दूर असावा. किमानपक्षी त्याच्या दोन बाजूंला खुली जागा असावी. वधा- करतां आणलेल्या जनावरांचा गोठा वस्तीपासून निदान शंभर फूट दूर असावा. कसाईखान्याच्या व गोठ्याच्या वर माडी किंवा बसण्यासाठी . जागा नसावी. ह्या दोहोंना फरसबंदी करून सांडपाणी व अन्य प्रवाही पदार्थांचा निकाल मोरीवाटे व्हावा. दोहोंमध्ये विपुल उजेड व खेळती