पान:आरोग्यशास्त्र.pdf/३११

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

आरोग्याचे कायदेकानू व त्यांची अंमलबजावणी ३०३ खुली हवा असावी. ह्या जागा स्वच्छ ठेवल्या पाहिजेत. कसाईखान्यांत कोणास येऊ देऊ नये. दुग्धगृहे दुग्धगृहें (डेअरी), गोठे व दुधाचीं दुकानें दुग्धगृहें, गोठे व दुधाचीं दुकानें ह्यांसंबंधीं कमिट्यांनी नियम करावेत. दुग्धगृहांत लोणी, दही व ताक करून विकतात. किंवा विक्रीस बाहेर धाडतात व दूधहि विकतात. दुभती जनावरें बाळगणार दुग्धगृहाचा मालक व दूध विकणारा असे प्रत्येकाचें नांव नोंदिलें पाहिजे. त्याचें वाताभिसरण, दर जनावरामागे लागणारी खुली जागा, स्वच्छता, मुत्रादि द्रव पदार्थांचा मोऱ्या वाटें निकाल व स्वच्छ पाण्याचा मुबलक पुरवठा याबद्दलची पूर्ण खबरदारी घेतली पाहिजे. जनावरांचे अंग स्वच्छ ठेवावें. धारेच्या पूर्वी त्यांचीं आंचळें स्वच्छ धुवावीं. दूध स्वच्छ असावें व तें पुढें दूषित न होऊं देण्याचा बंदोबस्त ठेवावा. स्पर्शसंचारी विकाराने आजारलेला किंवा आजाराची शुश्रूषा करणारा इस दूध काढणें किंवा विकणें ह्या कामीं घातक समजावा. प्रत्येक गाईमागें आठ फूट लांब व चार फूट रुंद इतकी जागा गोठ्यांत असावी. खुल्या जागेत व बांधलेल्या प्रत्येक गाईला हवेसाठीं ६०० घनफूट जागा पाहिजे. दुग्धगृहें इत्यादि इमारतींत सांसर्गिक रोग झाल्यास त्याची खबर आरोग्याच्या अधिकाऱ्यास दिली पाहिजे. एखाद्या ठिकाणच्या दुधापासून स्पर्शसंचारी विकार पसरण्याचा संभव आहे असें आरोग्याच्या अधि- कायास वाटल्यास मॅजिस्ट्रेटच्या परवानगीनें दुधाच्या जागा तपासाव्यात. गुरांचा डॉक्टर जवळ असल्यास जनावरें तपासावीं. दुग्धापासून स्पर्श- संचार होईल अशी त्यांची खात्री झाल्यास आपल्या वरिष्ठास तसा