पान:आरोग्यशास्त्र.pdf/३१२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३०४ आरोग्यशास्त्र रिपोर्ट करावा, म्हणजे वरिष्ठ अधिकारी दुधाच्या मालकाला २४ तासांच्या मुदतीच्या समन्सानें बोलावतात व पुन्हां परवानगी मिळेपर्यंत दूध न विकण्याचा हुकूम देतात. 6 सांसर्गिक रोग मसूरिका (देवी), विषूचिका (कॉलरा), घटसर्प ( डिप्थेरिआ ), ॠप, धावरें (एरिसपेलिस ), लोहितांगज्वर ( स्कार्लेट फॉवर ), टैफस आंत्र सन्निपात ज्वर (अँटेरिक फीवर), टैफाईड फीवर, रिलॅप्लिंग फीवर, व कंटिन्यूड फीवर ( सतत राहणारा ज्वर ), सूतिका ज्वर, प्लेग ह्या रोगांची वर्दी आरोग्याच्या अधिकाऱ्याला देण्याबद्दल सक्ती असते. या यादीत गोवर, डांग्या खोकला, कांजण्या ( चिकन पॉक्स ) व विषूचिकेच्या सांथींत अतिसार हे आजार पुष्कळ ठिकाणीं घालतात. घरांतील कर्ता पुरुष अथवा त्याच्या अभावीं शुश्रूषा करणारा मनुष्य किंवा तो नसल्यास घरति राहणारा अन्य इसम, त्यानें आरोग्याचे अधिकाऱ्याला सांसर्गिक रोग झाल्याचे आढळून आल्यास त्यानें त्या- बद्दलचें प्रतिज्ञापत्र (सर्टिफिकेट ) आरोग्याच्या अधिकाऱ्याकडे धाडलें पाहिजे. न धाडल्यास तो चाळीस रुपये दंडास पात्र होतो. अशा आजाऱ्याला एकापेक्षां अधिक डॉक्टर पहावयास आले तर त्यांपैकी प्रत्ये- कानें आजाराची खबर दिली पाहिजे. गुरांच्या डॉक्टरने ग्लॅडर्स, फार्सी व फूट अँड मौथ डिसीज हे आजार जनावरांस झाल्याचे आढळून आल्यास त्याची वर्दी आरोग्याच्या अधि- कायास दिली पाहिजे. एखाद्या जनावराच्या आंचळांवर क्षयग्रंथी 'झाल्याचें सर्टिफिकेट त्यानें दिल्यास तें जनावर कापून तपासतात. त्यांत क्षयग्रंथी निघाल्यास पंच- मगदुराचा पाऊण हिस्सा किंमत मालकाला मिळते व क्षयग्रंथी न निघाल्यास सबंध मिळते.