पान:आरोग्यशास्त्र.pdf/३१३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

आरोग्याचे कायदेकानू व त्यांची अंमलबजावणी ३०५ स्पर्शसंचाराचा प्रतिबंध एखाद्या इसमास वर्दीच्या लायक आजार झाला असल्यास त्याला रहावयास पुरेसें घर किंवा सोय नसली किंवा त्याच घरांत एकापेक्षां ज्यास्त कुटुंबे राहात असली किंवा तसला आजारी जहाजावर असल तर स्पर्शसंचारी आजारी ठेवण्याची सोय असलेल्या जवळच्या हॉस्पिटल- मध्ये त्याला धाडतात. ह्या कामी मेडिकल डॉक्टरचे अन्वयें नोंद झालेल्या डॉक्टर चें सर्टिफिकेट व मॅजिस्ट्रेटचा हुकूम लागतो. ह्या हुकुमाची बजावणी करण्याचे काम पोलिसाला किंवा स्थानिक सरकारच्या अधि- काऱ्याला सांगतां येतें. रोग्याचे आसपासचे लोकांनी रोग्यास नेऊ नये म्हणून निकराने झटपट केल्यास रोग्याला हलवितां येणार नाही. ह्या कामी अडथळा करणाऱ्या लोकांना मॅजिस्ट्रेट पुढे समन्स करवून दहा पौंड दंड वसूल करून घेतां येतो. ह्यापेक्षां ज्यास्त कांहीं करतां येत नाहीं. वर्दी देण्याच्या लायख़ रोग्यानें ग्रस्त इसमाला हॉस्पिटलमध्यें नेण्यास लागणारा गाडीखर्च, त्याचे सामान, कपडे इत्यादि व त्याची खोली जंतुविरहित करण्यास लागणारा खर्च, स्थानिक सरकारने करावा. आपल्यास सांसर्गिक रोग आहे असें माहीत असून जो कोणी मनुष्य सार्वजनिक जागेत किंवा गाडीवानाला खबर दिल्याशिवाय सार्व- जनिक गाडींत बसतो अशाला, व जो मनुष्य अशा प्रकारच्या रोग्यांना वरील प्रकारच्या जागेत किंवा गाडींतून नेतो तो दंडास पात्र होतो. सांसर्गिक रोगी बसला असेल अशी गाडी जंतुविरहित करण्याची सक्ती गाडीवानावर असते. वर्दीच्या लायख रोगाने ग्रस्त झालेला आजारी मेला असेल अशी जागा डॉक्टरच्या पसंतीप्रमाणे जंतुविरहित न करतां जर घरवाल्याने अथवा खाणावळवाल्याने एखाद्यास लबाडीनें रहावयास दिली तर तो मनुष्य शिक्षेस पात्र होतो. एखाद्या नवख्या मनुष्यानें २०