पान:आरोग्यशास्त्र.pdf/३१४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३०६ आरोग्यशास्त्र घर भाड्याने घेण्याच्या इच्छेने घरवाल्यास विचारल्यावर जर घराच्या मालकानें खोटेंच सांगितलें कीं, सहा आठवड्यांच्या आंत येथें कसलाहि सांसर्गिक रोग झाला नाहीं, तर तो मोठ्या दंडास किंवा एक. महिना कैदेच्या शिक्षेस पात्र होतो. जुन्या बि-हाडकरून घराच्या माल- कास सांसर्गिक आजार झाल्याची खबर न दिल्यास बिन्हाडकरू शिक्षेस पात्र होतो. सांसर्गिक व सांथीच्या आजारांत गरीब लोकांकरितां औषधे विकत आणून देण्याचा अधिकार स्थानिक सरकारास आहे. एखाद्याचें घर जंतुविरहित करितांना त्या घरांतील कुटुंबाला आपलें घर सोडावें लागतें. तेव्हां स्थानिक सरकारने त्या कुटुंबाला राहण्याकरितां हंगामी इमारत किंवा झोंपडी दिली पाहिजे. नोंदलेल्या डॉक्टरचें प्रतिज्ञापत्र दिल्यावर स्पर्शसंचारानें दूषित घराचें निर्जंतुकरण करण्याची नोटीस घरवाल्यास देण्यांत येते. चोवीस घंटयांत हें काम तडीस न गेल्यास नोटीस न देतां त्याच्या घराचे निर्जंतुकरण स्थानिक सरकार करितें. दूषित कपडे कोणापाशीं असल्यास त्यांचें निर्जंतुकरण करण्यास स्थानिक अधिकाऱ्यां- कडे धाडिले पाहिजेत. त्या कपड्यांस नुकसान पोहोंचल्यास तें माल- काला भरून दिलें पाहिजे. समजून उमजून स्पर्शसंचारी पदार्थ केराच्या' कोंडीत टाकण्याची मनाई आहे. सांसर्गिक रोगग्रस्त मनुष्य पुरतेपणीं बरा होण्याच्या अगोदर त्यानें धंदा केल्यास तो दंडास पात्र होतो. दूषित दुधापासून सांसर्गिक रोग झाल्याचे प्रतिज्ञापत्र आरोग्याच्या डॉक्टरने दिल्यास ज्या दुग्धगृहांतून तो दूध घेत असेल त्यांचें, गोठ्याचें व सोप्याचें अशीं नांवें व पत्ते दूध विकणाऱ्याने दिली पाहिजेत. दूधवाल्याचें घरांतील लोकांत किंवा नोकर लोकांत सांसर्गिक रोग झाल्याबरोबर त्याची वर्दी आरोग्याचे डॉक्टरला दिली पाहिजे.