पान:आरोग्यशास्त्र.pdf/३१५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

आरोग्याचे कायदेकानू व त्यांची अंमलबजावणी ३०७ स्पर्शसंचारी द्रव्यानें दूषित झालेले कपडे समजून उमजून धाव्या- कडे देणें हा गुन्हा होय. पण कपडे देतांना त्यास सांगूनसवरून स्पर्श न पसरेल अशा व्यवस्थेने दिल्यास हरकत नाहीं. स्थानिक अधिकारी दूषित कपड्यांचें व सामानाचें स्वखर्चानें निर्जंतुकरण करतात. आजाराचें उग्र स्वरूप असल्यामुळे किंवा रोग्याला घराच्या बाहेर नेऊन ठेवण्याची सोय नसल्यास रोग्याच्या शुश्रूषेसाठी स्थानिक सरकार ने दाया (नर्स) द्याव्या. घरांतील लोकांना अपाय होईल इतके दिवस तेथें मुडदा पडून राहिला तर तो किंवा स्पर्शसंचारी विकाराने मृत पावलेल्याचा मुडदा मॅजिस्ट्रेटच्या हुकुमानें दफन करण्यास नेतां येतो. स्पर्शसंचारी रोग्याचें प्रेत घरीं नेता येत नाहीं.