पान:आरोग्यशास्त्र.pdf/३२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२४ आरोग्यशास्त्र झाला किंवा मार्गेपुढें सरला तर, असा अपाय घडत नाहीं. ह्या फिल्टर- मध्यें अन्य उपायांनीं स्वच्छ केलेले पाणी घालावें लागतें; किंवा निदान गढूळ नाहीं असें तरी पाणी वापरावें लागतें. शोधकांतून बाहेर पड- णाऱ्या पाण्यांत कांहीं एक रासायनिक फेरफार ( जसे कॅरबॉनिक वायू दूर करणें इत्यादि ) घडून येत नाहीं. शोधकाचे तळाशीं कोळशाचा थर ठेवला व तो पालटत गेला तर, बाहेर येणाऱ्या पाण्यांत अन्याहि सुधा- रणा होतील. वरील विवेचनावरून असे दिसून येईल कीं, चांगल्या शोधकाचें तत्त्व असे आहे कीं- ( १ ) त्यांतील प्रत्येक भाग केव्हांही सहज धुतां येण्याजोगा असावा. ( २ ) शोधक द्रव्यांतील धातूंचा किंवा अन्य भाग शोधितांत ( filtrate) उतरूं नये. ( ३ ) शोधक द्रव्यें ज्या कामी वापरावयाचीं तें काम त्यांचेमुळे व्यवस्थित रीतीनें पार पडावें. ( ४ ) शोधक द्रव्याची शोधकता पुष्कळ दिवस टिकाऊ असावी. ( ५ ) शोधित पाणी, कामाचे मानानें साधारणपर्णे वेगानें उतरावें. अशुद्ध जलोत्पन्न विकार पाण्यांत [ १ ] उद्भिज पदार्थ असल्यास अतिसार व आंव हे रोग होतात. [२] खनिज पदार्थांपासून होणारे रोग : - ( १ ) मॅग्नेशिअम् पासून अतिसार व गलगंड हे रोग होतात. (२) शिशापासून पोटदुखी, अवरोध, हातापायांत कळा, चलनऱ्हास इत्यादि विकार होतात. कल्हई केलेल्या लोखंडाचे पात्रांतले पाण्यांत जस्त येते व हट्टी मलावष्टंभ होतो. लोखंडाचे पात्रांतले पाण्यानें अग्निमांद्य होतें. (३) प्राणिज पदार्थ पाण्यांत येण्यानें विषूचिका, आंव, आंत्रसूज, मलेरिया, टायफॉइड ज्वर, नारु, जंत इत्यादि रोग होतात.