पान:आरोग्यशास्त्र.pdf/३४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२६ आरोग्यशास्त्र पासून फैलावतो. वरील जंतूंचा प्रवेश झालेल्या पाण्याचे प्राशनानें कॉलरा पसरतो ह्याबद्दल पुष्कळ पुरावा आहे. हा विकार व टैफॉइड ज्वर, जलाशिवाय अन्य मार्गानेंहि पसरतात. परंतु दोन्हीं विकारांत पिण्याचें पाणी हें बहुशा किंवा बहुतेक सर्वांशीं कारण असतें. निपड़ोसी जलाची परीक्षा - आरोग्यरक्षणार्थ पाण्याची परीक्षा केली पाहिजे. तिचे प्रकारः- ( अ ) स्थूलमानानें केलेली परीक्षा. नेत्र, जिव्हा, घ्राणेंद्रिय ह्यांच्या साहाय्यानें केलेली तपासणी. ( आ ) रासायनिक परीक्षण. तक एडीक (इ) सूक्ष्मदर्शकद्वारा परीक्षण - ही परीक्षा सूक्ष्मदर्शकानें कर- ण्यांत येते. FTS BIFE ( उ ) जंतूंसंबंधी तपासणी:- ही तपासणी जंतूंसंबंधी लॅबोरेटरी- मध्ये होते. मोड जल घेणेंः-कांचेच्या बुचाची दीड शेराची बाटली घ्यावी. जें पाणी घ्यावयाचें असेल त्यानें ती बाटली तीन चार वेळां विसळावी. प्रवाह, तलाव, हौद अथवा विहीर ह्यांपैकीं ज्यांतील नमुना घ्यावयाचा असेल त्याचे मध्यभागी बुचासकट बाटली खोल बुडवावी. नंतर बूच काढून बाटली तोंडोतोंड भरून घ्यावी. शहरांतील पाणी तपासावयाचें असेल- तर तोटी कांहीं वेळ सोडून मग पाणी धरावें; नंतर बच लावावें. प्रत्यक्ष बुचाला लाख अथवा मेण वगैरे लाऊं नये. बाटलीचे तोंडाला स्वच्छ फडकें बांधून मग त्यांत लाख वगैरे लावावी. जलाच्या नमुन्याची बाटली थंड जागेत ठेवावी. ह्याची परीक्षा होईल तितकी लवकर करावी. बाटलीचे सोबत खालील माहिती असावी:- ( १ ) पाण्याची उत्पत्तिः - कूप, नदी इत्यादि. ( २ ) जलाचे खोली-