पान:आरोग्यशास्त्र.pdf/३६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२८ आरोग्यशास्त्र किंवा मॅग्नेशिअमचे कार्बोनेटमुळे पाण्यास कायमचें काठिण्य व क्षारधर्म येतात. अमोनिया वायूने आलेला क्षारधर्म पाणी उकळल्यानें नाहींसा होतो. ( २ ) काठिण्यः -- हंगामी व कायमचें असें दोन प्रकारचें काठिण्य असतें. त्याची माहिती वर दिली आहे. काठिण्य अंशानें मापण्याची चाल आहे. काठिण्य मापण्यास मऊ साबण एक भाग व ऊर्ध्वपातनानें केलेले पाणी ६ भाग अथवा मेथिलेटेड स्पिरिट ४ भाग ह्यांचें द्रावण घ्यावें. १०० क्यूबिक सेंटीमीटर पाणी कांचेच्या बुचाच्या कुपीत घालावें. ह्यांत साबणाचें द्रावण घालावें व पुरेसा फेस येईपर्यंत कुपी हालवीत रहावी. साबणाचें जितकें क्यू. से. द्रावण खर्च झालें असेल त्यांत एक वजा केला असतां एक लक्ष पाण्यांत किती अंश काठिण्य आहे हे समजतें. कायमचें काठिण्य मोजावयाचें असल्यास १५० क्यू. से. पाणी १२ ते २० मिनिटेंपर्यंत उकळावें. उडून जाणाऱ्या पाण्याची भरपाई करण्यासाठीं त्यांत ऊर्ध्वपातनाचे पाणी घालीत असावें. नंतर तें निऊं द्यावें. व तें १५० क्यू. से. होईपर्यंत त्यांत ऊर्ध्वपातनाचे पाणी घालावें. ह्यापैकीं १०० क्यू. से. पाणी गाळून घ्यावें. ह्याची परीक्षा वरप्रमाणें साबणाचे द्रावणाने करावी. एकंदर काठिण्य व कायमचें काठिण्य ह्यांमधील जें अंतर तें हंगामी काठिण्य होय. (३) क्लोरैड्स --- जमीनीतील क्षार, मूत्राचे झिरप्याचा प्रवेश व सामुद्र जल ह्यांमुळे पाण्यांत क्लोरैड्स येतात. काडीखाराचे द्रावण अशा पाण्यांत घातल्यास पांढरा साखा बसतो. नट्रेट्स - मंद केलेलें सल्फ्यूरिक अॅसिड व ( Metaphenylinedia- mine) मेटॅफेनिलिनेडिरॅमिन ह्यांचे थोडे थेंब नैट्रेट्स असलेल्या पाण्यांत घातल्यास त्यास लगेच पिवळा रंग येतो. दुर्गंधी मैलापाण्याचे अंशाचा प्रवेश पाण्यांत नुकताच झाला असेल तर पाण्यांत नैट्रेट्स येतात. असलें पाणी सर्वस्वी त्याज्य असतें.