पान:आरोग्यशास्त्र.pdf/३७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पाणी २९ नैट्रेट्स:- प्राणिज पदार्थांचा प्राणवायूशीं पूर्ण संयोग झाल्यानें नैट्रैट्स होतात. असलें पाणी उकळावें. शेषभाग सल्फ्यूरिक अॅसिड व थोडें ब्रूसिन घालावें म्हणजे तांबडा रंग येतो. दहा हजार भाग पाण्यांत भाग नैट्रेट्स असणें ही क्षम्य मर्यादा समजावी. अमोनिआ - पाण्यांत नेसलरचें द्रावण घातल्यानें अमोनिआचे/ प्रमा- णानुरूप पिवळा अथवा पिंगट रंग येतो. गटाराचे पाण्यापासून व खता- पासून ऊर्ध्वपातनानें अमोनिया निघतो. परंतु आल्ब्युमिनयुक्त पदार्थां- वर पोटॅश् परमँगनसचे क्षारयुक्त द्रावणाची क्रिया झाल्यास आणखी अमोनिआ निघतो. ह्याला ऑर्गनिक अथवा आल्ब्युमिनाइड अमोनिआ म्हणतात. अगोदरचे कृतीने काढलेला अमोनिआ सुटा किंवा सलैन अमोनिआ म्हणतात. अमोनिआचा लेश अनेक प्रकारच्या पाण्यांत व पावसाचे पाण्यांतही सांपडतो. म्हणून अमोनिआ आहे एवढ्यावरूनच त्यांत प्राणिज पदार्थ आहे असें मानूं नये. धातूच्या पात्रांत कांहीं काल पाणी सांठवून ठेवल्यास पाण्यांतील नैट्रेट्सचें पृथः- करण होतें. पण अशा स्थितीत धातूंचा लेश पाण्यांत उतरतो. हे अशुद्ध पदार्थ पोटॅशिअम परमँगनेटचे आम्ल द्रावणापासून पुष्कळ प्राणवायु शोषून घेतात व ऑक्सिजन - ॲब्सॉर्ड - अमोनिआ निघतो. पाण्याचे शुद्धतेबद्दल मत ठरवितांना सुटा अमोनिआ, आल्ब्युमिनाइड अमोनिआ व ऑक्सिजन - ॲब्सॉर्ड अमोनिआ ह्या तिहींचा विचार करावा. परीक्षा - ( १ ) फ्री अमोनिआ - सुटा अमोनिआ काचकुपीत २५० क्यू. से. पाणी घालून त्यापैकी ५० क्यू. से. आटून जाईपर्यंत पाणी उकळावें. उरलेल्या पाण्यांत २ क्यू. से. नेसलरचें द्रावण घालावें. ह्याने येणारे रंगाइतका रंग अमोनिई क्लोरिडचे अर्कोदकांत केलेल्या द्रावणांत नेसलरचें द्रावण घालून आणावा. काचकुपीत उरलेलें पाणी घेऊन आल्ब्युमिनाइड अमोनिआसंबंधीं तपासणी करावी.