पान:आरोग्यशास्त्र.pdf/३८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३० आरोग्यशास्त्र (२) आल्ब्युमिनाइड अमोनिआ - काचकुपीतील पाण्यांपैकी आणखी ५० क्यू. से. पाणी आटवावें व हें पाणी अर्कोदकाचे कुपींत ओतावें. ह्यांत २५ क्यू. से. पोटॅशिअम परमँगनेटचें क्षारमय द्रावण घालावें. नंतर ५० क्यू.से. द्रव आटवावा. पूर्वीप्रमाणें नेसलरचे द्रावणानें परीक्षा करावी. वरील दोन प्रयोगांनी निघालेल्या अमोनिआला चार दशांशांनीं गुणावें. म्हणजे एक लक्ष पाण्यांत किती अमोनिआ आहे हें निघेल. लोह व लोखंडः - मंद केलेलें हैड्रोक्लोरिक अॅसिड व यलो प्रशिएट ऑफ पोटॅश यांच्या मिश्रणानें लोह असलेल्या पाण्यास निळा रंग येतो. शिसें व तांबें:- अमोनिअम सल्फैडनें निळा रंग येतो. क्यू. एकंदर घन भागः - काचकुपी आधीं वजन करावी. त्यांत १० से. पाणी घालून तें आटवावें. नंतर ही कुपी वजन करावी. दोन वजन - मधील अंतर हा पाण्यांतील घन भाग समजावा. कुपीच्या तळाशीं साखा काळसर असला तर, प्राणिज किंवा उद्भिज अंश समजावा व तो पांढरा असल्यास खनिज भाग जाणावा. प्रकरण २ रें ०९. P त्याज्य पदार्थांची विल्हेवाट ऊ मलमूत्र व अन्य त्याज्य पदार्थ गोळा करणें, हालविणें व T त्यांची विल्हेवाट लावणें १ ) -- SIP कोणत्याहि वस्तीतील मलमूत्र, घाण व सांडपाणी आणि राख, धूळ, शेण, केर, टाकलेले अन्न इत्यादि पदार्थ गोळा करणें, हालविणें -च त्यांची विल्हेवाट लावणें ह्यांची व्यवस्था अवश्य झाली पाहिजे. तबेले, गोठे, कसाईखाने ह्यांतील घन व द्रव त्याज्य पदार्थ आणि रस्त्यांवरील केर व कारखान्यांतील सांडपाणी ह्रीं सर्व दूर नेली पाहिजेत. ए